Vidhan Sabha 2019 : ....हे लाभाचे पद नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अमित गोरखे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे पद लाभाचे पद नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,  तरीही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अमित गोरखे यांनी नोंदविली.

विधानसभा 2019 : पिंपरी - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे पद लाभाचे पद नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,  तरीही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अमित गोरखे यांनी नोंदविली. 

गोरखे सध्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष असून त्यांची आई अनुराधा गोरखे या भाजपच्या नगरसेविका आहेत. दरम्यान, शिवसेना भाजप युतीमध्ये पिंपरी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असून शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. तरीही गोरखे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मूळतः हा भाजपचा मतदारसंघ आहे. तसेच सध्या या मतदारसंघात भाजपचे 14 नगरसेवक आहेत. मागील पाच वर्षांत या मतदार संघाचा जो विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही.

हा मतदार संघ विकासापासून वंचित राहिला आहे, त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज भरला आहे. आपण अण्णाभाऊ विकास महामंडळाचे अध्यक्ष असलो तरी हे पद लाभाचे नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. यापूर्वीही महामंडळाच्या अध्यक्षानी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तरीही पक्षश्रेशींचा निर्णय मान्य असेल, असेही गोरखे यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhansSabha 2019 Pimpri Amit Gorkhe Politics