महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे नाव बदलण्याची सरकारवर नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - महाराष्ट्र विद्या प्राधिकरण हे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच 'एससीईआरटी'करण्याची नामुष्की शिक्षण खात्यावर ओढवली आहे. अन्यथा या संस्थेला केंद्राकडून मिळणारा निधी बंद होणार होता.

पुणे - महाराष्ट्र विद्या प्राधिकरण हे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच 'एससीईआरटी'करण्याची नामुष्की शिक्षण खात्यावर ओढवली आहे. अन्यथा या संस्थेला केंद्राकडून मिळणारा निधी बंद होणार होता.

गेली अनेक वर्षे एनसीईआरटी प्रमाण राज्यात एमएससीईआरटी कार्यरत होती. परंतु नवे सरकार आल्यानंतर गुणवत्ता आणि शैक्षणिक संशोधन तसेच कामकाजातील समन्वय यासाठी या सरकारी संस्थेचे नाव महाराष्ट्र विद्या प्राधिकरण करण्यात आले. या संस्थेच्या नियंत्रणाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) देखील आणण्यात आले. त्याला वर्ष होत नाही तोच हे नाव राज्य सरकारला पुन्हा बदलावे लागत आहे.

शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांकडे याबाबत विचारणा केली असता, नाव बदलण्याचे आदेश जारी केल्याचे त्यांनी सांगितले. नाव बदलाच्या कारणाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की केंद्रीय संस्थांच्या म्हणजेच एनसीईआरटीच्या समकक्ष संस्थांना केंद्राकडून निधी दिला जातो. पण महाराष्ट्र सरकारने ते नाव महाराष्ट्र विद्या प्राधिकरण केल्याने केंद्राकडून येणारा लाखो रुपयांचा निधी बंद होणार होता. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने विद्या प्राधिकरणाचे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शासन निर्णय देखील घाईने आज जारी करण्यात आला आहे.

Web Title: maharashtra vidya pradhikaran issue