इथं राज्य संकटात आहे, अन् तुम्ही शिक्षण मंत्र्यांसाठी नवी गाडी खरेदी करताय?

Varsha_Gaikwad
Varsha_Gaikwad

पुणे : सध्या कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात असून त्यामुळे राज्य सरकारने अनेक योजनांना कात्री लावली आहे. पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेली शिक्षक भरतीवर बंदी आणली असून शिक्षण सेवकांच्या मानधनात अद्याप वाढ केलेली नाही. असे असताना शिक्षण मंत्र्यांसाठी लाखो रूपयांची नवीन वाहन खरेदी कशाला?, असा प्रश्न आता संघटनांमार्फत विचारला जात आहे.

शालेय शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयीन वापरासाठी तब्बल बावीस लाख त्र्यांऐशी हजार शहाऐंशी रुपये इतक्या किंमतीची वाहन खरेदी करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. परंतु सध्या कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात असल्याने राज्य सरकारने अनेक योजनांना कात्री लावली आहे. इतकच काय तर आरोग्य विभाग वगळता सर्व विभागातील नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनातही कपात केली आहे. असे असताना ही नवीन वाहन खरेदी कशाला, असा प्रश्न सोशल मीडियाद्वारे अनेकांनी उपस्थित केला आहे.

पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीवर शालेय शिक्षण विभागाच्या पत्रामुळे निर्बंध लादले गेले. परंतु अजूनही ही भरती सुरू झालेली नाही. परिणामी हजारो पदे रिक्त असताना शिक्षक भरती होऊ शकत नाही. याशिवाय नवनियुक्त शिक्षण सेवक यांना केवळ सहा हजार रुपये मानधनावर काम करावे लागत आहे.

महागाई वाढली तरी गेल्या दहा वर्षात शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही, असे असतानाही शिक्षण मंत्र्यांच्या गाडीसाठी इतका खर्च का केला जातोय. शिक्षण क्षेत्रातील अन्य प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत का? राज्य सरकारने ही उधळपट्टी त्वरित थांबवावी, अशी मागणी डी.टी. एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदनही असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

"बेरोजगार युवक, सामान्य जनता सरकारकडे मोठ्या आशाने पाहत असून रसरकारने अशी उधळपट्टी करून जनतेची आपल्याबद्दलची धारणा बदलू नये. राज्य सरकारने जनतेच्या करावरील उधळपट्टी थांबवावी. राज्याच्या अर्थ विभागाने रखडलेल्या शिक्षकभरतीला विशेष परवानगी आणि शिक्षण सेवक मानधनवाढ द्यावी,"
- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com