Maratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद

धोंडिबा कुंभार
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे. दुकाने शंभर टक्के बंद होती. येथील लवळेफाटा, पिरंगुटकँप तसेच घोटावडेफाटा परिसरात वाहनांची वर्दळ अत्यल्प होती.

पिरंगुट : मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आज पिरंगुट (ता.मुळशी) येथील परिसरात सकाळपासूनच 
नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे. दुकाने शंभर टक्के बंद होती. येथील लवळेफाटा, पिरंगुटकँप तसेच घोटावडेफाटा परिसरात वाहनांची वर्दळ अत्यल्प होती. सर्व व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी व विक्रेत्यांनीही बंदला अघोषित पाठिंबा दिल्याने सर्वत्र दुकाने बंद होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येण्याचेही टाळले. येथील पुणे कोलाड रस्ता वाहनांच्याअभावी मोकळा दिसत आहे.

Web Title: #MaharashtraBandh Pirangut huge support for Bandh