महाराष्ट्राचे नयनतारांकडून आभार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध करण्यात आला. या कृतीबद्दल नयनतारा यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. अशी स्थिती परत उद्‌भवणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध करण्यात आला. या कृतीबद्दल नयनतारा यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. अशी स्थिती परत उद्‌भवणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

सहगल यांना संमेलनाच्या आयोजकांकडून आमंत्रण गेल्यानंतर त्यांनी होकार दिला होता. त्याची तयारी म्हणून त्यांनी भाषणही इंग्रजीतून तयार केले होते. पण त्यांचे आमंत्रण अचानक रद्द करण्यात आले. त्यांचे भाषण प्रशांत तळणीकर यांनी अनुवादित केले होते. त्यांच्याकडे त्यांनी महाराष्ट्राच्या आभाराचे पत्र इमेलद्वारे पाठविले आहे. या संमेलनाला यायला मिळाले असते, तर आनंद झाला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 
पत्रात त्यांनी म्हटले आहे, की मला आमंत्रण मिळाले, तेव्हा मराठी लेखक-कवींशी बोलण्याची संधी मिळणार होती. म्हणून आनंदानी ते स्वीकारले. मराठी ही माझ्या वडिलांची मातृभाषा होती आणि महाराष्ट्र त्यांचे घर होते. त्यामुळे माझ्यासमोर बसणाऱ्या श्रोत्यांना माझ्या भावना समजाव्यात म्हणून भाषणही भाषांतरासाठी पाठविले होते. परंतु आमंत्रण रद्द केलेल्या मला ती संधी मिळाली नाही. 

"मला आलेले असंख्य दूरध्वनी, मेल, प्रसारमाध्यमांतील बातम्यांमधून माझे आमंत्रण रद्द झाल्याबद्दल निषेध करण्याच आल्याचे समजले. अनेक गावांमध्ये माझ्या भाषणाचे वाचन झाले. महाराष्ट्रातून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे मी भारावून गेले आहे, भावनावश झाले आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राची आणि विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन करणाऱ्या लोकांनी दाखवलेल्या निर्धाराबद्दल त्याची मी ऋणी आहे. आमंत्रण रद्द केल्याबद्दल नापंसती व्यक्त करणारे मंत्री नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचेही आभार. अशी स्थिती पुन्हा उद्‌भवू नये, ही अपेक्षा आहे,'' असे त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Maharashtra's Gratitude from Nayantara