महाराष्ट्रीयन क्रिकेटरने बनवली देशातली पहिली 'कार्गो सायकल'; वाचा या अफलातून सायकलविषयी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद असल्याने मुळातच प्रतिभावान असलेला 'विराग मरे' मात्र शांत बसला नाही. सामान्यांचे जीवन सुकर व्हावे म्हणून त्याने देशातील पहिली कार्गो सायकल विकसित केली.

पुणे : क्रिकेटच्या 'पॅशन'मुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा पुण्यात आला. गिनीज बुकमध्ये सलग 50 तास क्रिकेट खेळण्याचा विश्‍वविक्रमही त्याने प्रस्थापित केला. जगभरात त्याची चर्चा ही झाली, पण याने पोटाचा प्रश्‍न काही मिटला नाही. म्हणून त्याने छोट्या व्यवसायाला सुरवात केली. व्यवसायात जम बसत असतानाच कोरोनाची साथ आली आणि होत्याचे नव्हते झाले. 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​

लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद असल्याने मुळातच प्रतिभावान असलेला 'विराग मरे' मात्र शांत बसला नाही. सामान्यांचे जीवन सुकर व्हावे म्हणून त्याने देशातील पहिली कार्गो सायकल विकसित केली. त्यासाठी व्यवसायात मिळालेले थोडे पैसेही त्याने त्यात ओतले. उपलब्ध साधनांच्या आधारे त्याने साडेसहाफूट लांबीची साठ किलो वजन सहज वाहून नेणारी सायकल त्याने तयार केली. विशेष म्हणजे हे सर्व काम त्याने स्वतःच्या हिंमतीवर केले. त्यासाठी त्याने वेल्डींगमशीनही खरेदी केले. पाच ते सहा महिन्यांच्या अथक प्रयत्न आणि 20 हजार रुपये खर्चून त्याने ही कार्गो सायकल पूर्ण केली. भाजीपाला, छोट्यामोठ्या वस्तू, किराणा सामान वाहून नेणाऱ्यांसाठी ही सायकल म्हणजे एक वरदानच आहे.

'त्या' निवृत्त पोलिस निरीक्षकाचा जामीन फेटाळला; दारुच्या नशेत कारने उडवले होते ५ जणांना​

मरे म्हणाले, "सायकल हे सामान्य भारतीयांचे वाहन आहे. खेड्यापासून शहरातील रस्त्यांवर सर्वांनाच सायकलची गरज असते. बहुतेक लोक सामान वाहून नेण्यासाठी सायकलचा वापर करतात. परंतु, त्यासाठीची योग्य सुविधा उपलब्ध नाही. म्हणून पुढच्या चाकाच्यावर मी एक मोठी ट्रॉली तयार केली आहे.'' सायकलचे मॉडेल तयार झाले असून, त्याच्या पेटंटसाठी मरे यांना अर्ज करायचा आहे. परंतु त्यासाठी लागणारे शुल्क अजून अपुरे पडत आहे. कला शाखेत पदवीचे शिक्षण घेतलेल्या मरे यांनी उपजत ज्ञानाच्या आधारे अभियांत्रिकीची ही किमया साधली आहे. 

...म्हणून शेतकऱ्यांवर आली बटाटे उपसून काढण्याची वेळ​

कार्गो सायकलची वैशिष्ट्ये :
- पुढच्या चाकावर कार्गो ट्रॉली तयार करण्यात आली आहे.
- त्यावर 50 ते 60 किलोचे वजन सहज ठेवता येते. 
- काम नसल्यावर ट्रॉली बंदही करता येते. 
- तीन वेगवेगळ्या पद्धतीने हॅंडल वापरता येते. 
- मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास किफायतशीर किमतीत सायकल उपलब्ध होईल. 
- दूध, भाजीपाला, छोट्या वस्तू, वर्तमानपत्र आदींची वाहतूक शक्‍य. 

Image may contain: 1 person

कार्गो सायकलची मजबुती आणि गती वाढविण्यासाठी मी त्यात योग्य ते बदल केले आहेत. सायकलचे प्रत्यक्ष उत्पादन व्हावे म्हणून मी औद्योगिक विश्‍वातील लोकांना भेटत आहे. मला आशा आहे लवकरच सायकल बाजारात येईल. 
- विराग मरे, आविष्कारकर्ता 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtrian cricketer Virag Mare builds Indias first cargo cycle