कटफळला 'पाणी फाउंडेशन'चे महाश्रमदान

संतोष आटोळे 
बुधवार, 2 मे 2018

शिर्सुफळ (पुणे) : कटफळ (ता.बारामती) येथे 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच वर्षांच्या बालकापासुन 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत तब्बल दिड हजार श्रमाच्या पुजाऱ्यांनी हातात टीकाव, फावडे, घमेली घेऊन 40 मीटर लांबीच्या 15 (सी. सी. टी) सलग समतल चर मोठ्या उत्साहात खोदल्या. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर माती व पावसाचे पाणी अडून भूगर्भात मुरण्यास मदत होणार आहे.

कटफळ (ता. बारामती) या गावाने यंदा पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. येथे या उपक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाची कामे सुरु आहेत. या श्रमदानात लाऊड स्पिकरवर लावलेल्या 'तूफान आलया ...' या गाण्यावर ठेका धरत (सी. सी. टी) सलग समतल चर, माती बंधारे, दगडी बांध ही कामे तांत्रिक पद्धतीने करण्यात आली.

महाश्रमदानात पनवेलच्या नादस्फूर्ती प्रतिष्ठान, बारामतीच्या एन्व्हायरमेंट फोरम, पुणे विभागीय विज कंपनी कर्मचारी, पुणे, मुंबई, येथील श्रमजीवी नागरिक, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक नामदेव ननावरे, पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्य प्रशिक्षक ज्योती सुर्वे, गावच्या सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, ग्रामसेवक सतिश बोरावके, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व आजी- माजी पदाधिकारी व पाणी फाउंडेशन टीमचे कार्यकर्ते, ग्रामस्थांसह पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, मयुर साळुंके, बाळकृष्ण मगर, प्राजक्ता शिंदे, गणेश इरकर, श्रीकांत शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.  

कलकत्त्याहून आयटी अभियंता श्रमदानासाठी बारामती..
या महाश्रमदानात अशिक्षीत ग्रामीण भागातील लोकांपासून शहरी भागातील उच्चशिक्षितांनी घेतलेला सहभाग लक्षणीय होता.यामध्ये कानपुर येथील आय.आय.टी.मध्ये एम.टेक.झालेल्या व कोलकाता येथील यु.सी.बेरकेली या कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या प्रसेनजित पाॅल या 27 वर्षीय युवकाचा श्रमदानातील सहभाग सर्व स्थानिक युवकांना प्रेरणादायी ठरला.

Web Title: mahashramdan at katfal baramati paani foundation