पंधराशे विद्यार्थिनींनी घडविले अहल्याबाईंचे जीवनदर्शन

गणेश कला क्रीडा मंच (पुणे) - अहल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित महाश्‍वेता हे महानाट्य सादर करताना अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी.
गणेश कला क्रीडा मंच (पुणे) - अहल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित महाश्‍वेता हे महानाट्य सादर करताना अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी.

पुणे - अहल्याबाई होळकर यांचे स्फूर्तिदायी जीवनचरित्र महानाट्यातून पाहायला मिळाले. सुमारे दोन तास चाललेल्या या महानाट्याचे ‘शिवधनुष्य’च जणू अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी समर्थपणे पेलले. क्षणोक्षणी अंगावर रोमांच उभारणारे ‘महाश्‍वेता’ हे नाट्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलमधील सुमारे दीड हजार विद्यार्थिनींनी मंगळवारी (ता. २४) गणेश कला क्रीडा मंच येथे ‘महाश्‍वेता’ हे महानाट्य साकारले. होळकर कुटुंबाने १९३९ मध्ये शनिवारपेठेतला होळकर वाडा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला होता. सोसायटीने या ठिकाणी अहिल्यादेवी प्रशाला ही मुलींसाठीची शाळा सुरू केली. या वास्तूच्या सहस्रचंद्रदर्शन वर्षानिमित्त  महानाट्य सादर केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे होते. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार रामहरी रूपनवर, पीएमपीच्या नयना गुंडे, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, संचालक मिलिंद कांबळे, डॉ. सविता केळकर, शाळा प्रमुख स्नेहल कुलकर्णी, दर्शना कोकरे, पर्यवेक्षिका अनघा डांगे, कार्याध्यक्षा ज्योत्स्ना कांबळे, उपकार्याध्यक्षा दीपा अभ्यंकर, अर्चना पंच, विद्यार्थिनी प्रतिनिधी गीता मालुसरे उपस्थित होते. 

अहल्यादेवींचा वारसा पुढे  चालू ठेवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com