महात्मा गांधीजीच्या खडकवासल्यातील भाषणाचे मुद्दे; आज देखील प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधीजीच्या खडकवासल्यातील भाषणाचे मुद्दे

महात्मा गांधीजीच्या खडकवासल्यातील भाषणाचे मुद्दे

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : देशात १९४५ साली 'चलेजाव चळवळीच्या' वारे जोरात वाहत होते. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या हालचाली सुरु होत्या. या धामधुमीत महात्मा गांधीजीनी १५ नोव्हेंबर १९४५ रोजी त्यांनी 'रोटरी क्लब'च्या ग्रामीण सुधारणा केंद्रास दिलेल्या भेट दिली होती. सरदार वल्लभभाई पटेल व इतरही मंडळी हजर होती. या घटनेस आज सोमवारी ७६ वर्ष पूर्ण होत आहे. येथील भाषणात त्यांनी खेडी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने विचार मांडले होते. यंदा स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना त्यावेळी गांधीजीनी खडकवासला येथे केलेल्या भाषणाचे मुद्दे आज देखील विचार करायला लावणारे प्रेरणादायी आहेत.

हेही वाचा: बार्शी : आमदार राऊत यांच्या अंगावर केमिकल टाकण्याचा प्रयत्न

ग्रामीण सुधारणा केंद्रची कल्पना केंद्राचे सचिव एफ.पी.पोचा यांची होती. केंद्राच्या वतीने दवाखाना व सुतिकागृह(नसिंग होम) चालविले जात होते. चार वर्षे सुरू असलेले काम पाहण्यासाठी गांधीजी येथे आले होते. गांधीजींना असे कार्य कस्तुरबा गांधी निधीच्या माध्यमातून करावयाचे होते. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.मुशिला नायर, मणीबेन पटेल, प्यारेलाल उपस्थित होते.

त्यावेळी गांधीजी म्हणाले होते, देशातील सात लाखे खेड्यांची उन्नती करावयाची असल्यास खर्च कमी करावा लागेल. कार्य साधेसुधे व स्वच्छ असले पाहिजे. पण खर्च मात्र बेताचा असला पाहिजे, खेड्यांची उन्नती करताना पाश्चिमात्य राष्ट्रांचे अनुकरण करू नका. तसे केल्यास परिस्थिती अधिक बिघडेल... स्त्रियांना त्यांच्या आरोग्याबाबत अधिक प्रशिक्षित करावे लागेल. परमेश्वराने मला शक्ती दिली तर त्या शक्तीचा विनीयोग इतर कार्यासाठी करण्याचा माझा इरादा आहे. केवळ सुतिकागृह चालवून व गरोदर स्त्रियांची सेवा करून भागायचे नाही. तर बाळंतपणानंतर मुलांची निगा कशी राखायची त्यांना खाऊ केव्हा, कसे घालायचे, त्यांची काळजी कशी घ्यावयाची याचे शिक्षण त्यांना आपण दिले पाहिजे. स्त्रियांनीही त्यात काळजीपूर्वक लक्ष घालून ते शिक्षण घेतले पाहिजे.

हेही वाचा: स्वातंत्र्यसैनिक आजी कंगनावर संतापल्या; PM मोदींना केलं आवाहन

७६ वर्षापूर्वी या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे पाच ते सात हजार ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्राचे चिटणीस इब्राहिम चिनॉय, श्री.वसौ.डॉ.विश्वनाथन, श्री.व सौ. एस.ई.बाडीया, डॉ.एल.व्ही. देशपांडे, सरदार रास्ते, सरदार एस.सी.मुदलीयार, शंकरराव देव, बापूसाहेब सणस, डॉ. के.सी. घारपुरे, डॉ.जी.व्ही. देसाई, डॉ.बा.चि.लाग, शांताबाई परूळेकर, जे.व्ही.दातार उपस्थित होते. पुणे खडकवासला दरम्यान, विविध गावांनी स्वागत कमानी उभारल्या होत्या. गांधीजींना पाहाण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. खडकवासला गावात तिरंगी झेंडे व फुलांनी सजले होते. गांधीजींचे जल्लोषात स्वागत केले होते.

आज 'स्मरण महात्म्याचे'स्मरण कार्यक्रम

खडकवासला गावातील भैरवनाथ मंदिरास गांधीजीनी भेट देऊन सभा घेतली. हा खडकवासला गावाच्या इतिहासाचे सोनेरी पान आहे. या घटनेचं अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा स्मरण करण्यासाठी 'स्मरण महात्म्याचे' याचे आयोजन श्री भैरवनाथ विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांनी केले आहे. या प्रसंगाचे साक्षीदार असणार्‍या ग्रामस्थांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. आज सोमवारी गावातील महात्मा गांधी चौक येथून कार्यक्रमाला सुरवात होईल. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, आमदार भिमराव तापकिर, विद्यापिठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, रोटरी क्लब ऑफ पुना अध्यक्ष निवृत्त कर्नल भरत हलाडी उपस्थित राहणार आहेत. साक्षीदार असणार्‍या ग्रामस्थांच्या मुलाखतीवर आधारावर चित्रफीत दाखविली जाणार आहे.

तेव्हा आणि आज ही ताज्या बातम्यांसाठी 'सकाळ'

गांधीजी 'गावात येणार आहेत', 'त्यासाठी गाडी व्यवस्था', अशा बातम्या. त्यावेळी कार्यक्रमापूर्वी दोन दिवस आधी 'सकाळ'च्या अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर १९४५ रोजी मोठी बातमी अंकात होती. तसेच १७ नोव्हेबर अंकात पहिल्या पानावर खडकवासला गावातील कार्यक्रमाचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. तसेच, २०१० मध्ये गांधीजी आल्याच्या घटनेला ६५ वर्षे झाले निमित्त ग्रामस्थांकडून माहिती घेऊन सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती.

loading image
go to top