स्वच्छता मोहीम, व्याख्यानांनी अभिवादन

कोथरूड - महेश विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली.
कोथरूड - महेश विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली.

पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २) पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधींचा जीवनप्रवास सांगणारी व्याख्याने, स्वच्छता मोहीम यांसारखे उपक्रम राबवत त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे नवनिर्माण सेवातर्फे गांधींजींच्या पुणे स्टेशनजवळील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी एम. रशीदखान, चंद्रशेखर भोसले, अरुण गुजर उपस्थित होते. 

गांधी जयंतीनिमित्त पुणे शहर काँग्रेसतर्फे शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले. पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी सागर इंगळे, प्रसाद लोंढे उपस्थित होते. पक्षाच्या कसबा कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात, गोपाळ तिवारी आणि उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या क्रीडा सेलतर्फे अध्यक्ष सचिन सावंत यांनी बापुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विनोद पुरोहित, रोहित गुरव उपस्थित होते.

पीएमपी बसगाड्यांची स्वच्छता 
भारतीय जनता पार्टीतर्फे गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे मनपा बस स्थानकाजवळील पीएमपीएलच्या बसगाड्यांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते. वैकुंठ स्मशानभूमीतील दशक्रिया विधी घाटाचीही स्वच्छता करण्यात आली. या वेळी नगरसेवक राजेश येनपुरे, रवी अनासपुरे, छगन बुलाखे उपस्थित होते. तसेच भाजप पुणे शहर उपाध्यक्ष असलम खान यांच्या हस्ते पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रफिक शेख, ताहेर आसी उपस्थित होते. 

राष्ट्रीय समाजपक्षातर्फे गांधीजींच्या पुणे स्टेशन येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर, सविता जोशी उपस्थित होत्या. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मनोहर गाडेकर, संदीप मोरे उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष कार्यालयात गांधीजींच्या प्रतिमेस शालिनी जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विनायक चाचर, सुरेश पवार उपस्थित होते. अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र हरिजन सेवा संघाचे डॉ. विकास आबनावे म्हणाले, ‘महात्मा गांधी हे दया, क्षमा, शांती आणि अहिंसा हे गौतम बुद्धाचे गुण प्रत्यक्षात आणणारे सत्याग्रहाचे प्रणेते होते.’

विद्यार्थ्यांकडून आगाखान पॅलेसची स्वच्छता 
महेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गांधीजींचे वास्तव्य असणाऱ्या आगाखान पॅलेस परिसराची स्वच्छता केली. तसेच रघुपती राघव राजा राम हे भजन गात विद्यार्थ्यांनी गांधींचे स्मरण केले. कोथरूड येथील आशिष गार्डन चौकात वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देणारे फलक घेऊन अभियान राबविले.

महात्मा गांधींचे विचार चिरंतन - श्रीनिवास पाटील
‘मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारातून प्रेरणा घेतली. त्यांचे विचार मानवतेच्या कल्याणाचे, चिरंतन आणि वैश्विक आहेत,’’ असे प्रतिपादन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे उद्‌घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथील गांधी भवन येथे झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा गांधी यांचा विचार गणेशोत्सवात मांडणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात आला. 

पाटील म्हणाले, ‘‘महात्मा गांधी यांनी वर्ण विद्वेष, जातीयता आणि शेतकऱ्यांवर अन्याय या विरुद्ध लढा देऊन जीवन कार्याला सुरवात केली. वृत्तपत्रे, प्रबोधनाच्या मार्गाने लढा दिला. गरिबी निर्मूलनाचा ध्यास घेतला.’’ समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार उपस्थित होते.

रेल्वे स्थानकामध्ये श्रमदानाने स्वच्छता
म हात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रेल्वेच्या पुणे विभागातील स्थानकांवर स्वच्छतेसंबंधी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शाळा-महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी यातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, संघटना व लोकप्रतिनिधी यांनी श्रमदान करत सहभाग घेतला होता. 
या वेळी रेल्वेचे व्यवस्थापकीय कार्यालय ते पुणे रेल्वे स्थानक परिसर अशी स्वच्छता रॅली काढण्यात आली. यामध्ये विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, प्रफुल्ल चंद्रा यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता झाली. याप्रसंगी शिरोळे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.जयंतीच्या निमित्ताने स्थानक परिसरात महात्मा गांधी यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com