फुले, आंबेडकर आदींचे साहित्य डिजिटल रूपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व ग्रंथ डिजिटल स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली असून, या सर्व समित्यांचे प्रमुख व हे काम करणाऱ्या ‘केपीएमजी’च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, महात्मा फुले समितीचे सचिव प्रा. हरी नरके, डॉ. आंबेडकर समितीचे प्रा. अविनाश डोळस, छत्रपती शाहू समितीचे प्रा. रमेश जाधव, बाबा भांड, सिद्धार्थ खरात उपस्थित होते. महात्मा फुले, राजर्षी शाहू, सयाजीराव गायकवाड, डॉ.

पुणे - महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व ग्रंथ डिजिटल स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली असून, या सर्व समित्यांचे प्रमुख व हे काम करणाऱ्या ‘केपीएमजी’च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, महात्मा फुले समितीचे सचिव प्रा. हरी नरके, डॉ. आंबेडकर समितीचे प्रा. अविनाश डोळस, छत्रपती शाहू समितीचे प्रा. रमेश जाधव, बाबा भांड, सिद्धार्थ खरात उपस्थित होते. महात्मा फुले, राजर्षी शाहू, सयाजीराव गायकवाड, डॉ. आंबेडकर व अण्णा भाऊ साठे  यांचे पन्नास हजार पृष्ठांचे मराठी, हिंदी व इंग्रजीतील साहित्य डिजिटल स्वरूपात पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून दिले जाईल. ते कीवर्डस्‌च्या आधारे सर्च करता येईल.

Web Title: mahatma phule babasaheb ambedkar Literature in digital