महात्मा फुले वसतिगृह शताब्दी महोत्सव  बोधचिन्हाचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

महात्मा फुले वसतिगृहाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाला २८ ऑगस्टपासून सुरवात होत आहे. शताब्दी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज ज्येष्ठ लेखक हरी नरके यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे - महात्मा फुले वसतिगृहाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाला २८ ऑगस्टपासून सुरवात होत आहे. शताब्दी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज ज्येष्ठ लेखक हरी नरके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेकडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या वेळी विकास रासकर, कमल ढोले-पाटील, दीपक जगताप, अरुण कुदळे, रवी चौधरी, विजय लोणकर आदी उपस्थित होते.

महात्मा फुले वसतिगृहाची स्थापना १९२० ला
शिक्षणाला महत्त्व देऊन पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनी केली स्थापना
सध्या महात्मा फुले वसतिगृह संस्थेची दोन ठिकाणी वसतिगृहे
माळीभवन येथील वसतिगृहात ११० मुले
बीएमसीसी रस्त्यावरील चार मजली वसतिगृहात २५० मुली

वर्षभर होणारे उपक्रम
२८ ऑगस्टला शताब्दी महोत्सवाला प्रारंभ, महात्मा फुले करंडकाची घोषणा होणार
आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
लोणी येथे १४ एकर क्षेत्रात शाळा, वृद्धाश्रम सुरू करणार
सप्टेंबरमध्ये आंतरशालेय निबंध व ऑक्‍टोबरमध्ये संगीत स्पर्धा
जानेवारी २०२० मध्ये महात्मा फुले करंडक व्याख्यानमाला
फेब्रुवारीत महिला मॅरेथॉन स्पर्धा
मार्चमध्ये नाट्य स्पर्धा
जूनमध्ये कौशल्यविकास शिक्षण प्रकल्पाचा भूमिपूजन 
जुलैमध्ये महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या जीवनपटावरील मालिका प्रदर्शित करण्याचा मानस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Phule Hostel centenary logo unveiled

टॅग्स