महात्मा फुले जयंतीनिमित्त आज अभिवादन यात्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त युवा माळी संघटनेसह राज्यातील विविध माळी समाज संघटनांतर्फे  आज (ता. ११) दुपारी चार वाजता अभिवादन यात्रा काढण्यात येणार आहे. ही माहिती ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, युवा माळी संघटनेच्या अध्यक्ष सुनीता भगत यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. 

दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडे वाड्यापासून ते गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापर्यंत अर्थात समता भूमीपर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. या अभिवादन यात्रेचे उद्‌घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, रूपाली चाकणकर, रवींद्र चौधरी, मनीषा संदीप लडकत, वैशाली सुनील बनकर आदी उपस्थित राहणार आहेत. या यात्रेत पुणे, पिंपरी-चिंचवड, माळीनगर, सासवड, वाई, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगाव अशा विविध शहरांतील माळी संघटना सहभागी होणार आहेत. 

Web Title: Mahatma Phule Jayanti