महाविकास आघाडीचे आसगावकर विजयासमीप; भाजप पुरस्कृत उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

महाविकास आघाडीचे आसगावकर विजयासमीप; भाजप पुरस्कृत उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

पुणे : मतदानाची वाढलेली टक्केवारी, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बळ आणि शिक्षकांनी केलेले एकगठ्ठा मतदान यामुळे पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना १९ व्या फेरीनंतर  ६ हजार ११२ मतांची आघाडी आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी त्यांच्या पुरस्कृत उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. 

शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले होते. ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला.
गुरूवारी (ता.३) सकाळपासून बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मतमोजणीची तयारी सुरू होती. प्रत्यक्षात दुपारनंतर मतमोजणीस सुरूवात झाली. शिक्षक मतदारसंघातात ३५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याने पहिल्या फेरी पासून कोण मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले होते.

विजयासाठी २५ हजार ११४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. मतमोजणीत सुरूवातीपासूनच आसगावकर हे पुढे राहिले. परंतू त्यांंना विजयासाठीचा कोटा पूर्ण करता आला नाही. पसंतीक्रमाची मोजणी सुरू करण्यात आली. शुक्रवार दुपारपर्आतापर्यंत १९ फेऱ्यांमध्ये आसगावकर यांना १७ हजार ४०० मतेमते मिळाली आहेत. सावंत यांना ११ हजार २८८ तर पवार यांना ५ हजार ९४७ मते मिळाली आहेत. आसगावकर यांच्याकडे सहा हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. अजून ११ फेऱ्या शिल्लक असून दुपारनंतर अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. 

माझा विजय समिप आला आहे. यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिक्षक, संस्था, संघटना यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले. रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थांनी त्यांचे बहुमोल मत माझ्या पारड्यात टाकले.-जयंत आसगावकर, विजयी उमेदवार

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com