एकाही ग्राहकाला नेट मीटर नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पुणे - गेल्या दोन वर्षांत शहरात पंधरा हजारांहून अधिक ग्राहकांनी सोलर सिस्टीम बसविली. परंतु यापैकी एकाही ग्राहकाला महावितरणकडून नेट मीटर पुरविण्यात आला नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. 

या संदर्भात एमईआरसीच्या निर्देशाप्रमाणे महावितरणने दोन वर्षांपूर्वी परिपत्रक काढले. ज्यामध्ये नेट मीटर महावितरणने स्वतःच्या खर्चाने ग्राहकांना बसवून देणे बंधनकारक आहे. महावितरणच्या पुणे विभागाकडे या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली असता महावितरणने दिलेल्या उत्तरात ही धक्कादायक माहिती मिळाल्याचे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.

पुण्याच्या तीनही सर्कलने दोन वर्षांत एकही नेट मीटरची मागणी केली नाही. तसेच एकही नेट मीटर ग्राहकांना पुरविलेला नाही. ग्राहकांना नेट मीटर स्वतःच्या खर्चाने बसवावे लागले आहेत. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर त्याचे टेस्टिंग शुल्क तर वेगळे भरावे लागतेच, तसेच टेस्टिंगसाठी महावितरणही ग्राहकांना पैसे आकारत आहे. नेट मीटर बसविल्यावरही योग्य रीडिंग घेऊन बिल मिळायला ग्राहकांना चार महिने वाट पाहावी लागते.

नऊ ऑगस्टला सुनावणी
यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी पुण्यात वीज नियामक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीत महावितरणच्या या कारभाराची लक्तरे मांडणे आवश्‍यक आहे. ज्या ग्राहकांना सोलर सिस्टिमसंदर्भात नेट मीटर उपलब्ध करून देण्यापासून बिलिंगपर्यंत तक्रारी आहेत. त्यांनी सजग नागरिक मंचाच्या pranku@vsnl.com या ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन वेलणकर यांनी केले आहे.

Web Title: mahavitaran net meter pune