उत्पत्तीदिनानिमित्त माहेश्वरी समाजाकडून शंकराची आरती

रमेश मोरे
गुरुवार, 21 जून 2018

माहेश्वरी समाजाच्या वतीने येथील माहेश्वरी (ईंद्रप्रस्थ) चौकातील महापालिकेने बसविलेल्या शंकराच्या मुर्तीची सामुहिक आरती करण्यात आली.

जुनी सांगवी - जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव परिसरातील माहेश्वरी समाजाच्या वतीने येथील माहेश्वरी (ईंद्रप्रस्थ) चौकातील महापालिकेने बसविलेल्या शंकराच्या मुर्तीची सामुहिक आरती करण्यात आली.

माहेश्वरी समाजाचा पाचहजार एकशे एक्कावन्नवा उत्पत्तीदिनानिमित्त आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या दिवसाचे आध्यात्मिक महत्व समाज बांधवांना सांगितले जाते. पुर्वी मुळचा क्षत्रिय असलेला समाज महेश व पार्वतीच्या वरदानामुळे व्यापारी झाला. अशी माहेश्वरी समाजाबाबत आख्यायिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माहेश्वरी चौकातील भगवान शंकराच्या मुर्तीला फुलांनी सजविण्यात आले होते. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य  जवाहर ढोरे व उपस्थित नगरसेवक संतोष कांबळे शारदा सोनावणे, संतोष कांबळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, मुकुंद तापड़िया नीलेश अटल, दीपेश मालानी, गणेश चरखा, जमनाबाई राठी, मिना जंवार, मीरा तापड़िया, सुरेखा चांडक आदी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Maheshwari samaj group prayer at juni sangavi