Pune : महिला बचत गटाकडून दिवाळी साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आंबेगावात आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बचत गट

महिला बचत गटाकडून दिवाळी साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आंबेगावात आयोजन

आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव बुद्रुक येथील सावित्री महिला उद्योगिकीकरण समूह व महिला बचत गटकडून दिवाळी साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा युगंधरा कोंढरे व माजी उपसरपंच निलेश कोंढरे यांचेकडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनपर विक्री महोत्सवात गृहिनींनी घरगुती पद्धतीने बनविलेल्या साहित्यांचा खास सहभाग आहे.

बचत गटाच्या माध्यमातून सावित्री महिला उद्योगीकरण समूह तर्फे दोन महिन्यांपूर्वी महिला व मुलींसाठी प्रशिक्षण शिबिराला सुरुवात केली होती. दरम्यान, या प्रशिक्षण शिबिरात परिसरातील १५० महिलांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. या शिबिरात,आकाश कंदील,पणत्या,घरगुती पापड, पाणीपुरी, लोकरीचे कपडे, होम मेड कॉस्मेटिक साहित्य,समोसे, मोमोज,विविध प्रकारचे केक,मसल्याचे पदार्थ,आदींचे तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते.या प्रदर्शनात बहुतांशी पदार्थ हे होम मेड आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमांतून महिलांना रोजगार मिळाला आहे. असे साकळशी बोलताना युगंधरा कोंढरे यांनी सांगितले.

याशिवाय,बालाजीनगर येथील ब्लूमिंग संस्थेद्वारे दरवर्षी माणुसकीची आनंद कुटी या उपक्रमाद्वारे मुळशी परिसरातील आदिवासींना दिवाळीचा फराळाचे साहित्य देण्यात येते. महिला बचत गटातील सदस्य या उपक्रमातही उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतात. या प्रदर्शनात दिवाळी सजावट,खाद्यपदार्थ, हस्तकलेची कपडे, आकाश कंदील,माती पणती,कपडे, रांगोळी, सातारचे कंदी पेढे,आदीसह दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या विविध साहित्य खरेदीसाठी उपलब्ध आहे. भैरवनाथ शिवालय मंदिर शेजारील सभामंडपामध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.नागरिकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवण्याचे अवाहन महिला बचत गटाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Mahila Bachat Group Organizes Diwali Literature Exhibition And Sale Festival In Ambegaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..