लॉकडॉऊनच्या काळातही विक्रमी कामगिरीचा महामेट्रोचा दावा

कोरोना, लॉकडॉऊन हे संकट असतानाही शहर आणि पिंपरी चिंचवड प्रकल्पावर मेट्रोचे सरत्या आर्थिक वर्षांत ३ हजार ३०३ कोटी रुपयांचे काम झाले आहे.
Mahametro
MahametroSakal

पुणे - कोरोना, (Corona) लॉकडॉऊन (Lockdown) हे संकट (Crisis) असतानाही शहर आणि पिंपरी चिंचवड प्रकल्पावर मेट्रोचे (Metro) सरत्या आर्थिक वर्षांत ३ हजार ३०३ कोटी रुपयांचे काम झाले आहे. तर, मार्चमध्ये ६८५ कोटी रुपयांचे झाले आहे. लॉकडॉऊनच्या काळात ही कामगिरी विक्रमी असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. (Mahometro Claims Record Performance Even during Lockdown)

लॉकडॉऊनमुळे कामगारांची संख्या कमी झालेला असतानाही मेट्रोच्या कामावर फारसा परिणाम झाला नाही, असे मेट्रोने म्हटले आहे. तसेच फाईव्ह डायमेंशन बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग(५ डी बीम) प्रणालीच्या वापरामुळे मेट्रोचे काम वेगाने होत असून आर्थिक प्रगतीही काटेकोरपणे होत आहे, असे प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले आहे. २०१८-१९ मध्ये मेट्रोच्या कामावर २ हजार ८९४ कोटी रुपये खर्च झाला होता तर यंदाच्या आर्थिक वर्षात हा खर्च ३ हजार ३०३ कोटी रुपये झाला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या काळाच्या तुलनेत मेट्रोच्या कामांचा खर्च २. ३९ टक्क्यांवरून १४. १३ टक्के झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mahametro
पोलिसाने भावासह केली डॉक्‍टरची धुलाई; पुण्यातील धक्कादायक घटना

कामगारांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यामुळे मेट्रोची कामगिरी विक्रमी झाल्याचा दावा संचालक (वित्त) शिवमाथन यांनी केला आहे. लॉकडॉऊन असूनही पुणे आणि पिंपरीमधील दोन्ही मार्गांवरील मेट्रो स्थानकांची कामे वेगाने सुरू असून डबलडेकर पुलाचे कामही सुरू झाले आहे. तसेच ट्रॅक उभारणीचे कामही आता अंतिम टप्प्यात आल्याचे प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी सांगितले. मेट्रोच्या कामाला लॉकडॉऊनचा दोन वेळा फटका बसला. तरीही दोन्ही शहरांतील मेट्रोच्या कमांचा नियोजीत वेग गाठण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ अखेर दोन्ही शहरांतील कामे पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com