विशेष मुलांना लागली पुस्तकांची गोडी

प्रशांत घाडगे
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : सध्याच्या काळातील बहुतांशी विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण घेताना दिसून येतात. पुस्तकांचा वापर कमी होऊन मोबाईल, संगणक, ट्विटर या माध्यमांचा वापर वाढला आहे. मात्र जलद गतीने होणाऱ्या तंत्रज्ञान बदलामुळे समाजातील दिव्यांग, विशेष मुलांना शिक्षण घेणे अवघड जात असून, या मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा मुलांची आकलनशक्ती वाढावी व समाजापासून अलिप्त असलेली मुले मुख्य प्रवाहात यावीत या उद्देशाने मैत्रयुवा फाउंडेशनने 'फिरते पुस्तक ग्रंथालय' हा उपक्रम सुरू केला आहे. 

समाजातील विशेष मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी फाउंडेशनचे सदस्य शहरातील सेवासदन दिलासा कार्यशाळा, जीवनधारा, बालसदन या संस्थेतील विशेष मुलांना शिकवितात. 'मैत्रयुवा'तील सदस्य विविध गट करून या संस्थांमध्ये जाऊन मनोरंजनात्मक, गोष्टी, चित्ररूपी पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास घेतात. सध्या, पन्नास ते साठ विविध प्रकारची पुस्तके या फिरत्या ग्रंथालयात आहेत. 

जीवनधारा संस्थेच्या व्यवस्थापिका सुजाता शिंदे म्हणाल्या, ''संस्थेतील मुले एकत्रित येऊन उत्सुकतेने पुस्तकातील चित्रे, विविध गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतात. फाउंडेशनने सुरू केलेला पुस्तक वाचनाचा उपक्रम निश्‍चितपणे आमच्या संस्थेतील विशेष मुलांसाठी फायद्याचा ठरत आहे.'' 

गेल्या दोन महिन्यांपासून वंचित, विशेष मुलांना ग्रंथालयाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. या मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. येत्या चार महिन्यांत या मुलांकडून सामाजिक विषयावरील नाट्य आणि काव्य बसविणार आहे. 
- संकेत देशपांडे, अध्यक्ष मैत्रयुवा फाउंडेशन 

''पुस्तकांमुळे मला अभ्यासाची गोडी लागली. सुरवातीला शब्द समजताना अडथळे येत होते. मात्र, काही दिवसांनी चित्ररूपी पुस्तकांच्या माध्यमातून मला अर्थ समजायला लागला.'' 
रश्‍मी वैद्य, विद्यार्थिनी

Web Title: Maitra yuva foundation introduces Mobile library in Pune