पुण्यात मेजर सचिन मानकर यांचे निधन

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 20 मार्च 2017

मानकर यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर त्याच्या मूळगावी सांगरूण (ता. हवेली) येथे रात्री उशिरा शासकीत इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे - लष्करातील युनिट 15 मधील मेजर सचिन गोंविद मानकर (वय 35) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. 

मानकर यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर त्याच्या मूळगावी सांगरूण (ता. हवेली) येथे रात्री उशिरा शासकीत इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी 3 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मागील वर्षभरापासून ते पुण्यात नोकरी करीत होते. 

मानकर यांना मूळव्याधीचा त्रास होता. ते लवकरच राजस्थानला प्रशिक्षणासाठी जाणार होते. परंतु राजस्थानमध्ये उन्हाळा जास्त असल्याने तेथे मूळव्याधीचा त्रास वाढेल, म्हणून ते पुणे स्टेशन परिसरातील खासगी रुग्णलयात उपचार घेत होते. ऑपरेशन झाले होते. परंतु आज त्यांचे निधन झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. 
अचानक झालेल्या या प्रकारामुळे नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. त्याला 18 दिवसांची मुलगी आहे. सचिनच्या मागे आई, वडील, पत्नी, विवाहित बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे. सांगरुण गावातून लष्करात भरती झालेले सचिन हे एकमेव होते. सचिनने 10 वर्षे देशाच्या सीमेवर रक्षण करत होते. आज रविवारी त्याच्या निधनाने सांगरुणसह परिसरात शोककळा पसरली. दोन वर्षांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते, अशी माहिती गावचे माजी सरपंच नामदेव मानकर व त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

Web Title: major sachin mankar dead due to health reason