तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मांजरी खुर्दची बाजी

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मांजरी खुर्द - हवेली तालुका पातळीवरील शालेय कुस्ती स्पर्धेत मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्या मंदिर व जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नऊ सुवर्णपदकांसह तीन रौप्यपदके प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. हे सर्व मल्ल येथील शिवछत्रपती कुस्ती संकुलात सराव करीत असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. 

क्रीड़ा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व क्रीड़ा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने लोणीकंद येथील जानता राजा कुस्ती केंद्रात या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थी शुभम बोत्रे याने बावीस किलो, राज कारंडे याने एक्केचाळीस, समर्थ पाटील याने पंचेचाळीस, अनुप पाटील याने एकोणपन्नास, यश शिंदे याने पंच्चावन किलो वजनगटात तर १७ वर्षे वयोगटात कुणाल काकडे शेहचाळीस, संकेत पाटील पन्नास, यशराज जगताप एकोणसत्तर तर मुलींमध्ये बावन्न किलो वजन गटात सम्रुद्धी कारंडे या विद्यार्थी मल्लांनी सुवर्णपदक पटकावले. तसेच ओम कारंडे, श्रीधर पाटील, चांद मूल्ला यांनी आपआपल्या गटात रौप्य पदक  कमावले.

शिवछ्त्रपती कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सावंत, सतिश सावंत, राष्ट्रीय मल्ल महेश गायकवाड, विकास पाटील, क्रिडा शिक्षक अनिल चंद सर गायकवाड सर मुख्याध्यापक जे. के. ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

Web Title: majri khurda won in taluka-level school wrestling championship