दिवाळीसाठी घरीच बनवा जिओडेसिक आकाशकंदील

Aakash-Kandil
Aakash-Kandil

पुणे - दिवाळीमध्ये बाजारातून विकत आणलेल्या आकाशकंदिलापेक्षा अगदी आगळावेगळा आणि सुंदर अशा जिओडेसिक घनगोल आकारातून स्वतः तयार केलेला आकाशकंदील लावणे नक्कीच आनंदाचे ठरेल. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने जिओडेसिक आकारातून आकाशकंदील स्वतः बनविण्याची संधी कुतूहल संडे सायन्स स्कूल ग्रुप सर्वांसाठी उपलब्ध करीत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संचामध्ये दिलेल्या प्लॅस्टिकच्या नळ्यांमधून त्रिकोणांच्या मदतीने मुलांनी किंवा मोठ्यांनी हा जिओडेसिक घनगोल तयार करायचा आहे. हा अतिशय आकर्षक दिसणारा घनगोल संचामधल्या साहित्यामधून सजवून आगळावेगळा आकाशकंदील सहजपणे तयार करता येतो. आकाशकंदिलाची सजावट स्वतःच्या कल्पनेप्रमाणे करता  येणार असल्यामुळे प्रत्येकाचा आकाशकंदील वेगळा बनू शकणार आहे. वेगळ्या प्रकाराने सजवून आकर्षक आकाशकंदील बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना इ-प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे. 

दिवाळीनंतरही हा घनगोल वापरून घरामध्ये सजावटीसाठी नाईट लॅम्प, कॉर्नर पीस असे विविध प्रकार तुम्हाला बनविता येणार आहेत. स्वतःसाठी आणि इतरांना भेट देण्यासाठी देखील आपण मागणी नोंदवू शकता.

कुरिअरद्वारे घरपोच सेवा
विक्रीची किंमत ३८० रुपये आहे; परंतु घरपोच कुरिअरसहित सवलत शुल्क ३४९ रुपये आहे. अधिक माहितीसाठी ९३७३०३५३६९ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा ९८५००४७९३३ या क्रमांकावर ‘आकाशकंदील’ असा व्हॉट्‌सॲप करावा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com