घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग 

मीनाक्षी गुरव
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - रंगांचा उत्सव... रंगोत्सव म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते. यंदाची रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना नैसर्गिक रंगांचा वापर करत ती अधिक "रंगतदार'पणे कशी साजरी करता येईल, असा विचार होऊ लागला आहे. कृत्रिम रंगात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा त्वचा, डोळे, केस यांवर परिणाम होऊ नये, म्हणून नैसर्गिक रंगांची मागणी वाढत आहे. पण, अशातच घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून नैसर्गिक रंग तयार करता आले तर? नेमके घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत, यासाठीच्या काही टिप्स... 

* पिवळा रंग 
- घरगुती वापरातील हळदीचा वापर पिवळा कोरडा रंग म्हणून करता येईल. हळदीसमवेत बेसन पीठ किंवा मुलतानी मातीही वापरता येईल. मुळात हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकेल. 
- झेंडूची फुले गरम पाण्यात किमान सात- आठ तास भिजवून ठेवावीत. त्यानंतर हे पाणी गाळून वापरावे. 

* हिरवा रंग 
- कोथिंबीर, पुदिना या पानांची पेस्ट करून हिरवा रंग तयार करता येईल. 
- पालक किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात वाटून ते पाणी गाळून घ्या. कडुलिंब जंतूनाशक असल्याने त्याचा फायदा होईल. 

* गुलाबी रंग 
- यासाठी "बिटा'चा वापर करता येईल. किसलेले बीट पाण्यात टाकून ते पाणी वापरता येणे शक्‍य आहे. 

* नारंगी रंग 
- हा रंग मिळविण्यासाठी पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत. 
- केशर आणि प्राजक्ताच्या फुलांच्या दांडीपासून नारंगी रंग तयार करता येतो. 

* लाल रंग 
- लाल जास्वंद, पांगारी अशा फुलांच्या पाकळ्या रात्रभर भिजवल्यास हा रंग तयार होईल. 
- टोमॅटो आणि गाजराचा रस पाण्यात मिसळून ते पाणी वापरा. 
- रक्तचंदनाची पावडर कोरडा लाल रंग म्हणून वापरता येईल. 
- डाळिंबाची साल पाण्यात उकळून लाल रंग बनविता येतो. 

* काळा रंग 
- काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळल्यास काळा रंग तयार होईल 

* पांढरा रंग 
- मुलतानी मातीचा कोरडा पांढरा रंग म्हणून वापर करता येईल. 

Web Title: Make natural color at home