गाळ्यांच्या मालकी हक्काचे आदेश त्वरित काढा : खराटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पुणे - पानशेत पूरग्रस्तांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून गाळे मालकी हक्काने देण्याचे आदेश सरकारने त्वरित काढावेत, अशी मागणी पानशेत पूरग्रस्त समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

पानशेत पूरग्रस्तांना मालकी हक्काने द्यायच्या गाळ्यांबाबतचा प्रश्‍न अनेक वर्षे रखडला आहे. हे गाळे मालकी हक्काने देताना कसे द्यावे, याबाबत ऑगस्ट 1987 मध्ये शासन निर्णय झालेला आहे. अतिक्रमण नियमानुकूल करताना करावयाच्या कार्यवाहीबाबतही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असे समितीचे म्हणणे आहे.

समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे म्हणाले, ""शासन स्तरावर होणारी दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींची अनास्था पाहून पानशेत पूरग्रस्त समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सरकारने याबाबत त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास येत्या महापालिका निवडणुकीत युती सरकारला धडा शिकवू.''

Web Title: Make orders of ownership rights : Kharate