संकेतस्थळ, ऍपवर वीजबिल भरणा करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - महावितरणचे सुमारे 35 लाख वीज ग्राहक दरमहा ऑनलाइन 600 कोटी रुपये वीजबिल जमा करतात. ग्राहकांनी संकेतस्थळ (वेबसाइट), मोबाईल ऍपचा जास्तीत जास्त वापर करून बिलाची रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

धनादेशाद्वारे महावितरणकडे सुमारे सात लाख ग्राहक वीजबिल भरणा करीत असतात. विविध कारणांमुळे दरमहा 10 हजार धनादेश वटत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना 350 रुपये दंड सोसावा लागतो. वीजबिल भरणा करण्याच्या अंतिम मुदतीनंतर धनादेश वटल्यानंतर पुढील बिलात थकबाकी दिसते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार धनादेश वटण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश वटल्यानंतरच संबंधित ग्राहकाच्या खात्यावर रक्कम प्राप्त झाल्याची नोंद केली जाते. ग्राहक मुदतीच्या अंतिम दिवसाच्या आधी एक- दोन दिवस धनादेशाद्वारे वीजबिल भरतात, त्याचा ग्राहकांना नाहक फटका बसतो. यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाचा वापर करावा. त्याचप्रमाणे मोबाईल ऍप डाउनलोड करावे. या दोन्ही माध्यमांतून ग्राहक वीजबिल भरणा त्वरित करू शकतात. 

Web Title: Make a payment for the electricity bill on the website