"स्पायसॉफ्ट ऍप'ची खात्री करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पिंपरी - सेकंडहॅंड किंवा ऑनलाइन मोबाईल घेताना तो "स्पायसॉफ्ट' नाही ना?, याची खातरजमा करून घ्या. कारण, "स्पायसॉफ्ट'च्या माध्यमातून सायबर स्टॉकिंगचे गुन्हे घडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्‍यकता असल्याचे सायबरतज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी सांगितले. 

पिंपरी - सेकंडहॅंड किंवा ऑनलाइन मोबाईल घेताना तो "स्पायसॉफ्ट' नाही ना?, याची खातरजमा करून घ्या. कारण, "स्पायसॉफ्ट'च्या माध्यमातून सायबर स्टॉकिंगचे गुन्हे घडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्‍यकता असल्याचे सायबरतज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी सांगितले. 

बऱ्याचदा काही जण सेकंड हॅंड किंवा ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून मोबाईल खरेदी करतात. त्यात "स्पायसॉफ्ट' बसवले आहे की नाही, याची माहिती नसल्यामुळे काही जण शिकार होऊ शकतात. मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्यानंतरही असे प्रकार होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे दुरुस्तीनंतर आपल्या मोबाईलमध्ये कोणते ऍप, सॉफ्टवेअर टाकले आहेत, याची खातरजमा प्रत्येकाने करण्याची आवश्‍यकता असल्याचे डॉ. डिकोस्टा यांनी स्पष्ट केले. 

"स्पायसॉफ्ट'चे दुष्परिणाम 
मोबाईलधारकाचे छायाचित्र काढले जाऊ शकते, एखाद्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक आल्यास हॅकरद्वारे तो हॅक केला जाऊ शकतो, मोबाईलमधील संपर्क क्रमांक शेअर केले जातात, मोबाईलधारकाचे ठिकाण कळते, कॉल डिटेल्स व किती मेसेज आले अशी माहिती कळू शकते. 

असे ओळखा "स्पायसॉफ्ट' 
मोबाईलमध्ये "स्पायसॉफ्ट' ऍप कार्यरत आहे का?, याचा शोध घेण्यासाठी मोबाईलमध्ये अँटीव्हायरस, फायरवॉल आवश्‍यक आहे. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस यंत्रणा कार्यरत करताना ती अधिकृतपणे घ्यावी. अँटीव्हायरस आणि फायरवॉलच्या माध्यमातून अशा प्रकारचे स्पायसॉफ्ट शोधणे सहजशक्‍य असल्याचे डॉ. डिकोस्टा यांनी सांगितले. 

काय आहे "स्पायसॉफ्ट'? 
"स्पायसॉफ्ट' हे एक धोकादायक ऍप असून, ते स्मार्टफोनवर टाकलेले असते. या माध्यमातून तुमचा फोटो, मेसेज, तुमचे ठिकाण याची माहिती संबंधित संकेतस्थळावर टाकली जाऊ शकते. यासंदर्भात खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 

Web Title: Make sure Spy soft app