डिएसकेंच्या भावाला अमेरिकेला पळून जाताना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मागील वर्षी डिएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, मेव्हणी अन्य नातेवाईक व त्यांच्या कंपन्यामधील पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या प्रकरणात डिएसके यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांचाही सहभाग असल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे.

पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डी.एस.कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी हे अमेरिकेला पळून जात असताना मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावर अटक केली. पुणे पोलिसांचे पथक त्यांना आणण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मागील वर्षी डिएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, मेव्हणी अन्य नातेवाईक व त्यांच्या कंपन्यामधील पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या प्रकरणात डिएसके यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांचाही सहभाग असल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे.

मात्र, पोलिस कुलकर्णी यांचा शोध घेत असतानाही त्यांना कुलकर्णी सापडले नाहीत. दरम्यान, पुणे पोलिसांनी कुलकर्णीविरुद्ध लुकआऊट नोटीस काढली होती. दरम्यान, कुलकर्णी आज पहाटे मुंबई येथून अमेरिकेस पळून जात होते. त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस असल्याने विमानतळ कर्मचाऱयांनी त्यांना ताब्यात घेतले. पुणे पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makrand Kulkarni brother of DSK Arrested at Mumbai