हिवताप ‘गुडबाय’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

पुणे - सर्वेक्षण, जनजागृती, तत्परतेने मिळणारे प्रयोगशाळेतील अहवाल आणि प्रभावी उपचार यातून पुणे जिल्हा हिवताप निर्मूलनाच्या उंबरठ्यावर आहे. हिवतापाचे नियंत्रण याच पद्धतीने कायम राहिल्यास २०२२ पर्यंत पुणे जिल्हा हिवतापमुक्त होईल. त्यामुळे पुणे जिल्हा आता हिवताप निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पुणे - सर्वेक्षण, जनजागृती, तत्परतेने मिळणारे प्रयोगशाळेतील अहवाल आणि प्रभावी उपचार यातून पुणे जिल्हा हिवताप निर्मूलनाच्या उंबरठ्यावर आहे. हिवतापाचे नियंत्रण याच पद्धतीने कायम राहिल्यास २०२२ पर्यंत पुणे जिल्हा हिवतापमुक्त होईल. त्यामुळे पुणे जिल्हा आता हिवताप निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात हिवतापाच्या रुग्णांची संख्या नियंत्रित राखण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे, त्यामुळे दहा हजार लोकसंख्येमध्ये ०.१ टक्का हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हिवतापाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. हेच प्रमाण कायम राहिल्यास पुढील पाच वर्षांमध्ये पुणे जिल्हा हिवतापमुक्त होईल, असा विश्‍वास हिवताप निर्मूलन अधिकारी डॉ. सुरेश ढवळे यांनी व्यक्त केला. 
पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान हिवतापाचे अवघे ६९ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना हिवतापाचे निदान होताच तातडीने प्रभावी वैद्यकीय उपचार केले जातात. त्यामुळे हिवताप झालेल्या रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला याचा संसर्ग होत नाही. त्यातून रुग्णांचे प्रमाण नियंत्रित राखता येते. 

सातत्याने सर्वेक्षण
डासांपासून पसरणारा हा आजार नियंत्रित करण्यासाठी कीटक नियंत्रण हा प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यात सातत्याने डासांच्या उत्पत्तिस्थळांचे सर्वेक्षण करून ही ठिकाणे नष्ट करण्यात आली. गेली काही वर्षे सातत्याने हा कार्यक्रम राबविण्यात आल्याने या भागातील हिवताप पसरविणाऱ्या डासांचे प्रमाण कमी झाले. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या कमी होण्यात झाला. 

जनजागृती
हिवतापाबद्दल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. यापूर्वी गावांमधून वाहणारी उघडी गटारे आता बंदिस्त केली आहेत. कायम पाण्याने भरलेली डबकी आता गावात दिसत नाहीत. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट झाली आहेत. त्यासाठी आरोग्य खात्याने केलेली जनजागृती उपयुक्त ठरल्याचा विश्‍वास डॉ. ढेकळे यांनी व्यक्त केला. 
 

कसा होतो हिवताप
आनिफिलीस डासाची मादी चावल्याने होणाऱ्या जंतूसंसर्गातून हिवतापाचा संसर्ग होतो. हे डास फार घाण नसलेल्या सांडपाण्यात, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या डबक्‍यांमध्ये आढळतात. हे डास रात्री चावतात.

Web Title: Malaria goodby