हिवताप लवकरच ‘ऑल आउट’

सम्राट कदम
बुधवार, 1 जुलै 2020

हिवताप अर्थात मलेरिया! डासांमुळे होणाऱ्या या रोगावर बाजारपेठेत अनेक औषधे उपलब्ध असली तरीदेखील तो दरवर्षी जगभरात लाखो लोकांचे जीव घेतो. औषधांनाही पुरून उरण्याची शक्ती डासातील डंखात आढळणाऱ्या परजीवींमध्ये विकसित होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे ही बाब वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचा विषय ठरली होती. आता यावरदेखील रामबाण औषध शोधण्यात संशोधकांना यश आले.

पुणे - हिवताप अर्थात मलेरिया! डासांमुळे होणाऱ्या या रोगावर बाजारपेठेत अनेक औषधे उपलब्ध असली तरीदेखील तो दरवर्षी जगभरात लाखो लोकांचे जीव घेतो. औषधांनाही पुरून उरण्याची शक्ती डासातील डंखात आढळणाऱ्या परजीवींमध्ये विकसित होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे ही बाब वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचा विषय ठरली होती. आता यावरदेखील रामबाण औषध शोधण्यात संशोधकांना यश आले. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्राच्या (आयसीजीइबी) शास्त्रज्ञांनी यावर नवीन औषध तयार केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एनसीएल’च्या सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. आशिष भट्टाचार्य आणि संशोधक विद्यार्थी डॉ. ईश्‍वर कुमार आरटीकटला यांच्या चमूने ‘आर्टिमिनीसीनी पेप्टाडाइल व्हिनाईल फोस्फोनेट’ या संकरित रेणूचा शोध लावत त्याचे वनस्पतींपासून पृथक्करण करण्याचे काम केले आहे.  दिल्लीतील ‘आयसीजीईबी’च्या डॉ. आसिफ मोहम्मद आणि डॉ. पवन मल्होत्रा यांच्या प्रयोगशाळेत रेणूची ‘प्लाझ्मोडिअम’सोबतची अभिक्रिया तपासण्यात आली. औद्योगिक उत्पादन आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी हे रसायन आता उपलब्ध असेल.

Image may contain: text that says "असे झाले संशोधन २० १८ मधील हिवतापाचे रुग्ण सध्याच्या क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन या औषधांविरुद्ध परजीवींनी प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. आर्टिमिसीया (स्वीट वर्मवूड) या औषधी वनस्पतीपासून आर्टिमिनिसिनिया रेणूचे पृथक्करण पेप्टाडाइल व्हिनाईल फोस्फोनेटसोबत संकरित रेणू विकसित करण्यात आला अनाफिलस डासाच्या दंशातील परजीवी 'प्लाझ्मोडिअम'चे विलगीकरण आणि रेणूसोबत अभिक्रिया भारत ८५.२ इंडोनेशिया १३.१ इतर १.६"

वैशिष्ट्ये -
- हिवतापाला कारणीभूत ‘प्लाझ्मोडिअम’ या परजीवीला हा रेणू प्रतिबंध करतो. 
- रेणूचे सेवन केल्यामुळे परजीवीची पचनक्षमताच नष्ट होते.  
- प्रामुख्याने मृत्यूला कारणीभूत सेरेब्रल हिवतापावर सर्वांत उपयुक्त 
- या रेणूविरुद्ध परजीवी प्रतिकारशक्ती विकसित करू शकलेला नाही 
 
महाराष्ट्रातील हिवतापाचे रुग्ण आणि मृत्यू 
वर्ष - रुग्ण - मृत्यू 
२०१६ - २३,९८३ - २६ 
२०१७ - १७, ७१० - २० 
२०१८ - १०,७७५ - १३ 
२०१९ - ८,८६६ - उपलब्ध नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaria soon all out