माळेगाव गोळीबार प्रकरण ! जयदीप तावरे पोलिसांसमोर हजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगाव गोळीबार प्रकरण !  जयदीप तावरे पोलिसांसमोर हजर
माळेगाव गोळीबार प्रकरण ! जयदीप तावरे पोलिसांसमोर हजर

माळेगाव गोळीबार प्रकरण ! जयदीप तावरे पोलिसांसमोर हजर

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव: माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर ३१ मे रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात न्यायालयाने जामिन नाकारलेले माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे आज (सोमवारी) उशीरा पोलिस ठाण्यात स्वतःहून हाजर झाले. तत्कालिन तपासाधिकारी नारायण शिरगावकर यांनी रविराज गोळीबार प्रकरणात जयदीप  तावरे यांचा सहभाग नाही, असा दिलेला अहवाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संदीप के. शिंदे यांनी फेटाळला होता. तसेच या प्रकरणी पुण्यातील मोक्का न्यायालयाचे न्यायमुर्ती जी. पी. आगरवाल यांचा निर्णय कायम ठेवला होता. त्या प्रक्रियेविरुद्ध जयदीप यांनी दिल्लीतील सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती, परंतु तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे न्यायालयाच्या सुचनेनुसार जयदीप यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेला पोलिसांनीही लागलीच दुजोरा दिला.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

मोक्का न्यायालयाने प्रथमदर्शनी जयदीप तावरे यांच्याविरुद्ध गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याचे सांगितले होते. त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आता तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना जयदीप पोलिसाच्या ताब्यात आल्याने पुढील तपास करणे सोयीचे झाले आहे. याबाबत पोलिस निरिक्षक महेश ढवाण म्हणाले,`` जयदीप हा अनेक दिवस फरार होता. अर्थात त्याने वरिष्ठ न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी प्रय़त्न केले, परंतु तसे न झाल्याने त्याला स्वतःहून पोलिसात हाजर होण्याशिवाय पर्य़ाय राहिला नाही. मंगळवार (ता. २३) रोजी त्याला तपासाधिकारी उपविभागिय अधिकारी संबंधित न्यायालयात हाजर करतील.`` दरम्यान, रविराज तावरे गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा सहभाग नाही, असा अहवाल तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. शिरगावकर यांनी २१ जुलै रोजी दिला होता. तो अहवाल मोक्का न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री आगरवाल यांनी फेटाळला होता. शिवाय त्यांनी तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या जयदीप याला शरण यावे व १८ आॅगस्ट रोजी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करावे, असे आदेश दिले होते.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

दुसरीकडे, रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी माळेगावातील प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर खुन करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये त्यावेळी गुन्हा दाखल केला होता. संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेवून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली होती. एक अल्पवयीन मुलगा वगळता इतर संशयित आरोपी अद्याप जेरबंद आहेत.

loading image
go to top