चौकीदार चोर है... (व्हिडिओ)

माळेगाव (ता.बारामती) ः कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या थेट सभागृहात घूसन बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.
माळेगाव (ता.बारामती) ः कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या थेट सभागृहात घूसन बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.

माळेगाव (पुणे): कायद्यानुसार एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, गेटकेन ऊस बंद करून आडसाली ऊसाला प्राधान्य द्या, घामाचा दाम मिळालाच पाहिजे, चौकीदार चोर है, अशा घोषणा देत आज शेकडो आक्रमक सभासद राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याच्या सभागृह घुसले. परिणामी घोषणाबाजीने सभागृह अक्षरशः दणाणून गेले. याला निमित्त होते धरणे आंदोलनाचे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने गाळप झालेल्या ऊसा पोटी एफआरपीचा पहिला हप्ता 2215 रुपये देऊ केला आहे. तसेच आडसाली ऊस साडेचार हजार एकर गाळपाअभावी शिल्लक असताना तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यक्षेत्राबाहेर गेटकेन ऊस घेण्यासाठी काढली. आदी धोरणात्मक निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत माळेगाव सभासद बचाव कृती समितीने शुक्रवारी दिवसभर कारखाना कार्यस्थळावर धरणे आंदोलन केले. बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने एकरकमी एफआरपी 2768 रुपये मिळावी, दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शिल्लक राहिलेला सुमारे साडेचार हजार एकर अडसाली ऊसाचे गाळप तातडीने व्हावे, संचालक व कामगारांवरील हुकूमशाही बंद करावी आदी मागण्यांसाठी आंदोलनकर्ते खूपच आक्रमक झाले होते. विशेषतः या आंदोलनकर्त्यांना कारखान्याचे उपाध्यक्ष शशिकांत कोकरे, कार्यकारी संचालक विजय वाबळे हे पदाधिकारी सामोरे गेले.

दरम्यान, ``दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी कोणत्याही स्थितीत सभासदांच्या ऊसाला प्रधान्य दिले पाहिजे. अ़डसाली संपल्याशिवाय गेटकेन ऊसाचे टिपरू आणून दिले जाणार नाही,``असा इशारा नितीन शेंडेसह बहुसंख्य आंदोलनकर्त्यांनी दिला. योगेश जगताप म्हणाले,``माळेगावचा एकूण गाळपाचा आकडा, रिकव्हरी आणि उत्पादित साखर पोत्यांचे समिकरण जुळत नाही. सोमेश्वर, छत्रपती कारखान्यापेक्षा माळेगावची रिकव्हरी को. 86032 जातीचा ऊस गाळला असतानाही 1 टक्क्याने कमी आहे. बगॅसची बचत होत नाही, प्रतिदिनी लाखो युनिटचे वीजेचे उत्पादन घटले आहे, दोन महिने डिस्टलरी बंद राहणे आदी बाबींच्या माध्यमातून सभासदांचे आतोनात अर्थिक नुकसान झाले आहे. अध्यक्ष रंजन तावरेंसह सत्ताधारी संचालक मंडळाला जाब विचारण्यासाठी सभासद मोठ्या संख्यने रस्त्यावर उतरले.`` यावेळी संचालक अॅड एस. एन. जगताप, बाबुराव चव्हाण, पोपटराव तुपे, अशोकराव तावरे, अमरसिंह जगताप, सुनिल पवार, शिवाजीराव ढवाण, विनायक गावडे, प्रकाश तावरे, राजेंद्र ढवाण, विठ्ठलराव देवकाते, रविराज तावरे, अशोकराव जाधव आदींनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली.

एफआरपीच्या मुद्यांवर समोरासमोर या..!
माळेगावची एफआरपी 2768 इतकी निघते, असे कारखान्याच्या प्रशासनाने याआगोदर जाहिर केले. परंतु गतवर्षीच्या हिशोब पत्रकाचा अभ्यास केला असता माळेगावच्या एफआरपीची रक्कम किमान 25 ते 30 रुपये प्रतिटन अधिकची वाढत आहे. तसेच एफआरपीची रक्कम एकरकमी देता येते, या मुद्यांवर सत्ताधाऱ्यांनी समोरासमोर बसण्याची तयारी ठेवावी, असे खुले आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक मदनराव देवकाते यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com