अजितदादांनी ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यात अशी सुरू आहे तयारी 

कल्याण पाचांगणे
Monday, 3 August 2020

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारिकरण आणि सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ 15 आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. आगामी हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठे ठेवण्यात आले आहे.

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारिकरण आणि सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ 15 आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. आगामी हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठे ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता ऊस तोडणी मजुरांबरोबर अधिकाधिक हार्वेस्टर मशिनचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरणे यांनी दिली. 

फी कपातीसाठी मेल भेजो आंदोलन

माळेगाव कारखान्यात आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मिल रोलरचे पूजन सोमवारी (ता. ३) अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक योगेश जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तावरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ संचालक केशवराव जगताप, राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे, योगेश जगताप, अनिल तावरे, मदनराव देवकाते, नितीन सातव, अॅड.वसंतराव गावडे, स्वप्नील जगताप, सौ. संगिता कोकरे, मंगेश जगताप, बन्सीलाल आटोळे, तानाजी देवकाते, प्रताप आटोळे, सागर जाधव, दत्तात्रेय भोसले, कार्यकारी संचालक विजय वाबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराचे बील कोण देणार

तावरे म्हणाले की, माळेगाव कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद व कामगारांचे हित जोपासेल. साखरेचे दर, दैनंदिन खर्च व घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा विचार करून शेतकऱ्यांना अधिकाधिक ऊस दर देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करेल. त्यानुसार आगामी हंगामात सुमारे ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. आवश्यक असलेली पुरेशा ऊस तोडणी यंत्रणेचे प्रशासनाने करार केले आहेत. ११०० बैलगाड्या, ४५० ट्रॅक्टर गाडी, ट्रक ५०, ट्रॅक्टर ३५० आणि १० केन हार्वेस्टरचा समावेश समावेश असेल. संबंधित यंत्रणेला पहिला अॅडव्हान्स हप्ता देण्याचे काम सुरू आहे. आगामी ऊस गळीत हंगाम ऊस उपलब्धतेच्या बाबतीत परिपूर्ण असणार आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रात अंदाजे २० हजार ६४० एकर ऊसाची उपलब्ध होऊ शकतो. तसेच, सुमारे चार लाख टन गेटकेन ऊस घेण्याचाही मानस आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
   

माळेगाव कारखान्याचे महत्वकांक्षी विस्तारिकरण झालेले आहे. त्यानुसार प्रतिदिनी ९ ते १० हजार टन ऊस गाळप होण्यासाठी यंत्रसामुग्रीची देखभाल दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. अधिकाधिक ताजा ऊस गाळप करून साखर उतारा चांगला कसा मिळेल याचाही विचार केला जात आहे. तसेच डिस्टलरी, वीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न होतील.
 - बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Sugar Factory's crushing season from 15th October