मॉल, मल्टिप्लेक्‍सना आता पुन्हा नोटिसा

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंग शुल्क न आकारण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल आणि मल्टिप्लेक्‍स व्यवस्थापनांना कायदेशीर नोटिसा बजावण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी मंजुरी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशा पद्धतीनेच महापालिकेने उच्च न्यायालयात बाजू मांडावी, अशी अपेक्षा सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.  

मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत वाहन पार्किंग असावे, अशी भूमिका घेऊन महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल आणि मल्टिप्लेक्‍सना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यामुळे काही दिवस नागरिकांना मोफत पार्किंग मिळाले. परंतु, याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून मॉल आणि मल्टिप्लेक्‍स व्यवस्थापनांकडून पार्किंग शुल्क घेतले जात आहे. 

पार्किंग शुल्क न घेण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, न्यायालयातील याचिकेमुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यानुसार पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल आणि मल्टिप्लेक्‍सना कायदेशीर नोटिसा बजावण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला. तो एकमताने मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com