कुपोषणमुक्ती ‘पॅटर्न’चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कुपोषणाचा मावळ पॅटर्न राज्यातही राबविणार आहे. पॅटर्नचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
- भूषण मुथा, प्रांतप्रमुख, लायन्स क्‍लब प्रांत ३२३ डी २.

वडगाव मावळ - लायन्स क्‍लब ऑफ वडगावतर्फे मावळ व पुणे जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी राबविलेला व यशस्वी ठरलेला मावळ पॅटर्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. त्यांनी क्‍लबच्या कार्याचे कौतुक केले. 

आमदार बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्‍लबने राबविलेल्या उपक्रमाद्वारे तालुक्‍यातील कुपोषित बालकांना सकस आहार व औषधे पुरविण्यात आले. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प क्‍लबने केला आहे. कुपोषणमुक्तीचा ‘मावळ पॅटर्न’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. त्या वेळी आमदार भेगडे, लायन्स क्‍लब प्रांत ३२३ डी २ च्या कुपोषणमुक्त पुणे जिल्ह्याचे प्रांतप्रमुख भूषण मुथा, वडगाव लायन्स क्‍लबचे संस्थापक ॲड. दामोदर भंडारी, अध्यक्ष आदिनाथ ढमाले, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, झुंबरलाल कर्नावट उपस्थित होते. मुथा यांनी उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांनी क्‍लबच्या कार्याचे कौतुक केले. 

असा आहे मावळ पॅटर्न

  • संकल्पना : मावळ पंचायत समितीचा एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग व लायन्स क्‍लब ऑफ वडगाव
  • कालावधी : २०१५-१६ या वर्षी तालुक्‍यात कुपोषणमुक्त मावळ अभियान 
  • तालुक्‍यातील कुपोषित बालके : २३९
  • कुपोषित बालकांचा खुराक : गूळ, गावरान तूप व शेंगदाणा लाडू दररोज २ ते ३. एक सफरचंद किंवा केळी, राजगिरा लाडू, उकडलेले बटाटे, खजूर 
  • आरोग्य सुविधा : आवश्‍यक औषधे मोफत, बालकांची नियमित आरोग्य तपासणी व पालकांचे समुपदेशन
  • अभियानाचा परिणाम : सर्व मुले कुपोषणमुक्त झाल्याने अभियान यशस्वी
  • अधिकाऱ्यांच्या मते : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी अभियानाला कुपोषणमुक्तीचा मावळ पॅटर्न असे संबोधून जिल्ह्यातही तो राबविण्याची सूचना लायन्स क्‍लबला केली.
  • क्‍लबची भूमिका : जिल्ह्यातील एकवीसशे कुपोषित मुलांसाठी असाच उपक्रम राबवून तो यशस्वी
Web Title: malnutricion free pattern appreciated by devendra fadnavis