esakal | Pune : साहित्य खरेदीत गैरप्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra.

Pune : साहित्य खरेदीत गैरप्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी सीसीटीव्ही आणि त्या संबंधित उपकरणे खरेदीत झालेल्या गैरप्रकारापाठोपाठ आता ई-लायब्ररी साहित्यातदेखील मोठा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. लायब्ररीसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची जेम पोर्टलवर तपासणी केली असता प्रत्यक्षात चढ्या दराने झाली असल्याचे समोर आले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासी शाळां व वसतिगृहांच्या सोईसुविधेत वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत ३ टक्के निधी समाजकल्याण विभागाला उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे संच खरेदी करण्यात आले आहेत. त्यामध्ये जवळपास ५० ते ५५ लाख रुपयांचा घोळ असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे हे वृत ‘सकाळ’ने यापूर्वीच दिले होते. त्याची दखल घेत समाजकल्याण आयुक्तांनी समिती स्थापन करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. असे असताना आता सुमारे ४७ लाख रुपये खर्च करून ई-लायब्ररी साहित्य खरेदीतही घोळ असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ही खरेदी करतानासुद्धा सर्व नियमांची पायमल्ली करून अवास्तव दराने खरेदी करण्यात आली असल्याची कागदपत्रे ‘सकाळ’च्या हाती आली आहेत.

थीन क्लायंट कॉम्पुटर जेम पार्टलवर (गर्व्हेमेन्ट ई मार्केट) ७ हजार ५०० रुपयांना उपलब्ध असताना सेम स्पेसिफिकेशचा थीन क्लायंट कॉम्पुटर प्रतिनग ११ हजार ४०० नी ८० खरेदी करण्यात आले आहेत. अशाच पद्धतीने एलसीडी पॅनेल ८०, सर्व्हर रॅक ४, किबोर्ड आणि माउस ८० चढ्या दराने खरेदीत करण्यात आले आहे. पुणे येथील एका ठेकेदार कंपनीकडून ही खरेदी करण्यात आली आहे. ती करताना अटी-नियमांना मुरड घालत ठेकेदार कंपनीचे हित जोपासण्यावर अधिक भर देण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत खरेदी केलेल्या इतर वस्तूंचीही खरेदीत मोठा घोळ झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू झाली असतानाच त्यातच हा प्रकार समोर आल्याने समाज कल्याण आयुक्त व जिल्हाधिकारी या विषयात लक्ष घालणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नरनवरे यांच्याशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.

समाजकल्याण विभागाला नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून साहित्य खरेदी करताना काही गैरप्रकार झाले असतील, तर त्यांची चौकशी करण्यात येईल.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

loading image
go to top