माळशेज घाटावर वाढतेय गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

ओतूर - सह्याद्रिच्या पर्वत रांगात पुणे व ठाणे जिल्ह्याला जोडणारा पावसाळ्यात पर्यटकाचे प्रमुख आकर्षण असलेल्या माळशेज घाटावर वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

ओतूर - सह्याद्रिच्या पर्वत रांगात पुणे व ठाणे जिल्ह्याला जोडणारा पावसाळ्यात पर्यटकाचे प्रमुख आकर्षण असलेल्या माळशेज घाटावर वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

आल्हाददायक वातावरण व सर्वत्र पसरलेली हिरवळ तसेच छोट्या प्रमाणात वाहत असलेले धबधबे या सर्वांनी माळशेज घाट बहरला आहे. वर्षाविहार करणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरत आहे. तसेच जसजसे पावसाचे प्रमाण वाढत जाईल, तसतसे माळशेज घाटात लहान मोठे तीस पेक्षा जास्त धबधबे वाहू लागतील. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळ याने माळशेज घाटात पर्यटकांसाठी ठिकठिकाणी सिमेंट ब्लॉक, तसेच लोखंडी पाईपचे कठडे, वेगवेगळ्या ठिकाणी धबधब्यापर्यंत जाण्यास, पायऱ्या तसेच पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते बनवले आहेत. तसेच बसण्यासाठी विशेष व्यवस्था, छत्र्या व धोक्‍यासाठी सूचना फलक लावले आहेत. तसेच याठिकाणी स्थानिक तरुणांनी थाटलेली मक्‍याच्या कनसांची व इतर रानमेवा विक्रीची दुकाने ही पर्यंटकाना भुरळ घालत असून, त्या गावठी आंबे, जांभळे, आवळे, डाळिंब तर चहा कॉफी गरम भजी वडापाव यावर पर्यटक ताव मारताना दिसत आहे.

Web Title: Malshej Ghat Tourist rain