पुणे : पोलिसाच्या गळ्यातील ओळखपत्र ओढणाऱ्या तरुणाला अटक

Man arrested for pulling police ID card in pune
Man arrested for pulling police ID card in pune

पुणे : बंदोबस्तास नेमणुकीस असलेल्या पोलिसांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला थांबविल्यामुळे त्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील ओळखपत्राची दोरी ओढून शिवीगाळ केली. ही घटना येरवडा येथील आंबेडकर चौकात घडली.

पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या

या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी ए.ए. पडोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रितम अरुण गायकवाड (वय 39, रा. करुणा सोसायटी, येरवडा) असे संशयिताचे नाव आहे.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर कारची ट्रकला जोरदार धडक; एक ठार तर, दोन जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी पडोळे हे वरिष्ठांसमवेत आंबेडकर चौकात शुक्रवारी पोलिस बंदोबस्तास तैनात होते. त्यावेळी या तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये पोलिस कर्मचाऱ्यासह तेथील वाहनांचे चित्रीकरण सुरू केले. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याने तरुणाजवळचा मोबाईल काढून घेतला. त्यावेळी तरुणाने कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून गळ्यातील ओळखपत्राची दोरी ओढत शिवीगाळ केली. या प्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेंग्यू, चिकुनगुनियासह या आजारांवर पुणे विद्यापीठाच्या संशोधकाने शोधले औषध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com