Pune Crime CCTV Footage : पगार मागितल्याने सफाई कामगार महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण | Pune Crime News | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime CCTV Footage

Pune Crime CCTV Footage : पगार मागितल्याने सफाई कामगार महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण

Pune Crime News : आपला बाकी असलेला तीन महिन्याचा पगार मालकाकडे मागितल्यामुळे सफाई कर्मचारी महिलेला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

ही धक्कादायक घटना पुण्यातील एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये घडला असल्याची माहिती असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये एक व्यक्ती महिलेला बुक्क्यानी मारहाण करताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी येथील सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये हा प्रकार घडला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला जबर मारहाण करताना दिसत आहे.

दरम्यान, बबिता महेंद्र कल्याणी असं या पीडित महिलेचं नाव असून मागच्या तीन महिन्यापासून तिचा पगार झाला नव्हता. तिने तिच्या कामावर मालक असलेल्या अमजाद खान याचा भाऊ हर्षद खान याच्याकडे पैसे मागितल्यानंतर त्याने महिलेला मारहाण केली. (Marathi Tajya Batmya)

हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तक्रार दिली आणि त्यानुसार हर्षद याच्यावर अॅट्रॉसिटी आणि आयपीसी 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.