esakal | भरधाव टेम्पो डोक्यावरुन गेला, मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू; पुणे-नगर रस्त्यावरील घटना

बोलून बातमी शोधा

a man died on the spot in accident of tempo and two wheeler in Pune}

 विलास पवार हे काल शिरूर शहरातील काम उरकून कारेगाव येथे आपल्या दूचाकीवरून (क्र. एमएच १९ बीपी ०९५५) जात होते. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पो (क्र. एमएच १६ ७१४७) ची त्यांच्या दूचाकीला धडक बसली. ​

भरधाव टेम्पो डोक्यावरुन गेला, मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू; पुणे-नगर रस्त्यावरील घटना
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिरूर: पुणे - नगर रस्त्यावर सरदवाडीनजीक भरधाव वेगातील टेम्पोने मागून धडक दिल्याने दूचाकीस्वार जागीच ठार झाला. यात दूचाकीवर मागे बसलेला मुलगाही जखमी झाला. काल (ता. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. विलास आदिनाथ पवार (वय 43, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या दूचाकीचालकाचे नाव असून, त्यांचा मुलगा वैष्णव (वय १३) हा या अपघातात जखमी झाला.

 विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण?​

या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास पवार हे काल शिरूर शहरातील काम उरकून कारेगाव येथे आपल्या दूचाकीवरून (क्र. एमएच १९ बीपी ०९५५) जात होते. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पो (क्र. एमएच १६ ७१४७) ची त्यांच्या दूचाकीला धडक बसली. यात पवार हे रस्त्यावर पडल्याने टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. मुलगा वैष्णव हा विरूद्ध बाजूला पडल्याने बचावला. त्याला किरकोळ जखमा झाल्या. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो जागेवरच सोडून पळून गेला. 

पठ्ठ्यानं डेरिंग केली! बायकोच्या क्रेडिट कार्डवरून भरला चक्क गर्लफ्रेंडचा दंड!​ 
या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनाही घटनास्थळी येण्यास उशीर झाल्याने जवळपास तासभर मृतदेह रस्त्यावरच पडलेला होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.