जिना चढताना तोल गेल्याने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारांसाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरेकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना सोमाटणेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी दुपारी २.१० मृत्यू झाला.

टाकवे बुद्रुक : जिना चढताना घसरून पडलेल्या वडेश्वरच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बबन अरूण दरेकर (वय ३५) असे संबंधिताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास जिना चढून घरात जात असताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले.

डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारांसाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरेकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना सोमाटणेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी दुपारी २.१० मृत्यू झाला. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईक ताब्यात देण्यात आला. मावळ तालुका भाजप महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा शुभांगी दरेकर त्यांचे पती होत.

Web Title: A man died when imbalanced while walking on steps