पुणे : पत्नी, मुलींची हत्या करून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

हांडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. आज सकाळी दहा वाजता नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सांगण्यात आले.

कात्रज - कात्रजजवळील आंबेगाव खुर्द येथे पतीने दोन मुली व पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सरगरी हांडे (वय 42) यांनी पत्नी आणि दोन मुलींचा खून करून आत्महत्या केल्याचे आज (रविवार) सकाळी उघडकीस आले. हांडे हे पत्नी स्वाती (वय 39), मुलगी तेजस (16) व वैष्णवी (वय 12) यांच्या समवेत दत्तनगर टेल्को कॉलनीत राहत होते. हांडे हे मुळशी तालुक्यातील संत तुकाराम कारखान्यात कामाला होते. 

हांडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. आज सकाळी दहा वाजता नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले. दरवाज्या आतून बंद असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौघेजण मृत अवस्थेत आढळले. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: man kills daughters and wife commits suicide in pune