माणूस नावाने नाही, तर कामाने लक्षात राहतो : मधुरा वेलणकर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

जुनी सांगवी - माणूस नावाने नाही, तर कामाने लक्षात राहतो. असे जुनी सांगवी येथे रक्तदान शिबिरात बोलताना अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी व्यक्त केले. अरविंद ऐज्युकेशन सोसायटी व शितोळेनगर क्रिडा व युवक मंडळाच्या वतीने स्वर्गीय नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जुनी सांगवीतील लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थी, शिक्षक व नागरीकांनी आदींनी नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. 

या शिबीराचे उद्घाटन अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेवक मयुर कलाटे, संतोष कांबळे, नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, अजय शितोळे, नंदा शितोळे, भाऊसाहेब शिरोळे, सुषमा तनपुरे, महेश भागवत, जवाहर ढोरे, सुदाम ढोरे, उमेश बोरसे, आप्पा ढोरे, ज्येष्ठ नागरीक संघाचे ईश्‍वरलाल चौधरी, अशोक चव्हाण, रमेश राणे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढीने सहकार्य केले. यावेळी राजेंद्र जगताप, नाना काटे,सुदाम ढोरे आदींनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राहिलेल्या स्वर्गीय नानासाहेब शितोळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: The man remembers by the work, not by name: Madhura Velankar