बोलणे बंद केल्याने भोसरीत प्रेयसीवर वार

संदीप घिसे 
गुरुवार, 17 मे 2018

पिंपरी - बोलणे बंद केल्याने अल्पवयीन प्रेयसीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना भोसरी येथे सोमवारी (ता.१४) रात्री घडली. या प्रकरणी प्रियकराला अटक केली आहे.

शाहरुख रफिक शेख (वय २२, रा. आदर्शनगर, काजळे पेट्रोल पंपाच्या मागे, मोशी) असे अटक केलेल्या आरोपी नाव आहे. याबाबत सतरा वर्षीय युवतीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख याने पीडित युवतीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन बलात्कार केला. त्यामुळे त्या युवतीने आरोपी शाहरुख याच्याशी बोलणे बंद केले. या कारणावरून चिडलेल्या आरोपी शाहरूख याने सोमवारी रात्री फिर्यादी युवतीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच युवतीला घराबाहेर ओढत आणून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: man stabbed his girlfriend to death