पिंपरी: टीव्हीचा आवाज मोठा करून केली आत्महत्या 

संदीप घिसे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

उमेश महादेव शिंदे (वय ४१, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या प्रौढांचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांची पत्नी मुले घराबाहेर गप्पा मारत होती.

पिंपरी : टीव्हीचा आवाज मोठा करून राहत्या घरामध्ये गळफास घेत प्रौढाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे बुधवारी रात्री घडली.

उमेश महादेव शिंदे (वय ४१, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या प्रौढांचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांची पत्नी मुले घराबाहेर गप्पा मारत होती. त्यावेळी शिंदे यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. टीव्हीवर मोठय़ा आवाजात गाणी लावत छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

शिंदे हे गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

Web Title: man suicide in Pimpri