मंचर मध्ये बरसतोय जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मंचर : आंबेगाव तालुक्यात हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) पाणलोट क्षेत्रात भीमाशंकर -आहुपे  खोऱ्यात संततधार पाऊस सुरु आहे. शनिवारी (ता. 27) दुपारी एक वाजेपर्यंत एकोणपन्नास टक्के धरण भरले आहे. आज सकाळी आठ वाजता धरण 46.36 टक्के भरले होते.

गोहे खोऱ्यातील पाझर तलावातील पाणी सांडव्या वरून वाहत आहे. त्यामुळे घोडनदीला पूर आला आहे. पावसामुळे शेतातील तरकारी व भाजीपाला तोडणीची कामे बंद आहेत.  

बुधवार (ता.२४) पासून पाऊस सुरु झाला आहे. गुरुवारी (ता. २५) रात्री व शुक्रवारी (ता. २६) रात्री तसेच शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 766 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी धरणातील पाण्याची लेवल 715. 450 मीटर होती. सध्या 706.70 मीटर पाण्याची लेवल आहे. घोडेगाव, मंचर, अवसरी खुर्द, रांजणी, कळंब व सातगाव पठार भागातील ओढ्यानाल्याना पुर आले आहेत.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manchar observes good amount of rain