खड्डे बुजविण्यासाठी पोलिसच रस्त्यावर उतरतात तेव्हा...

dilip walse
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मंचर (पुणे) : श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर-मोरडेवाडी मार्गे तपनेश्‍वर मंदिर (उजव्या कालव्यालगत) रस्त्यांवर पावसामुळे सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वावाहनांच्या होणाऱ्या कोंडीमुळे त्रस्त झालेले पोलिसच त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी शनिवारी (ता. 3) हातात खोरी घेऊन खड्डे बुजविण्याचे काम केले. हनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागत होती.

श्रावण महिना सुरू झाल्यामुळे मंचर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या मोरडेवाडी रस्त्याचा वापर वाहनचालक करत आहेत. या डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. पण अधिकाऱ्यांनी हात वर केल्याने दुरुस्तीचे काम झाले नाही. दीड किलोमीटर रस्त्याची चाळण झाली. त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. ज्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना खड्डे चुकवून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. 

भीमाशंकरला ये- जा करणाऱ्या बसेस व अन्य वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त झालेल्या वाहतूक पोलिसांनी या संदर्भात पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलिस नाईक नवनाथ नाईकडे, विनोद गायकवाड यांच्याबरोबर चर्चा केली. खड्डे बुजविण्यासाठी सुनील जोरी व नितीन थोरात -भक्ते या टिपर मालकांशी चर्चा केली. त्यांनी जवळपास तीस ब्रास मुरूम रस्त्याच्या दुतर्फा टाकला. वाहतूक पोलिस मंगेश लोखंडे, दादासाहेब जाधव, संदेश काळडोके यांनी हातात खोरी घेऊन खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. अक्षय वळसे पाटील, अर्जुन थोरात, विलास शिंदे यांनीही या कामी मदत केली. 

सामाजिक काम म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पोलिस यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. शिवाजी चौकात कोणतेही वाहन उभे राहणार नाही याची काळजी वाहनचालकांनी घ्यावी. वाहतुकीत केलेल्या बदलाची कार्यवाही करण्यासाठी दोन पोलिस पथके कार्यरत राहतील. 
- कृष्णदेव खराडे, पोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchar : Police comes for filling up potholes.