कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या महिलांचा मंचर पोलिस ठाण्यात सन्मान 

कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या महिलांचा मंचर पोलिस ठाण्यात सन्मान 

मंचर : महिला दिनानिमित्त कोरोना कालावधीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना मदत करणाऱ्या आरोग्य, अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील महिलांचा सन्मान मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आला. 

मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्यात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अँड. संध्या बाणखेले, अरुणा टेके, संगीता बाणखेले, एकलहरे पोलिस पाटील सुमन पाटील यांच्या हस्ते झाले. 

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी रत्नप्रभा हरीश वायकर-पडवळ, अधीपरीचारिका वैशाली मोजाड मंचर ग्रामपंचायत कर्मचारी अर्चना बेंडे, स्नेहा मिसाळ, सुरेखा गवारी, अंगणवाडी सेविका सुरेखा दैने, आशा वर्कर सुरेखा गांजाळे, मंजुषा जाधव यांचा सन्मान पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलिस उपनिरीक्षक अपर्णा जाधव व मंचरच्या सरपंच किरण राजगुरू यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमिला टेमगिरे, नीलम टेमगिरे, मालती थोरात, वनिता बेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच मनीषा  गावडे यांच्या महिला निर्भय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पदावर काम करणाऱ्या महिला नावालाच असतात. त्यांचे पतीच कामकाज पाहतात. असा अनुभव यावेळी अनेक महिलांनी सांगितला. हा धागा पकडून नागापूर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैशाली पोह्कर म्हणाल्या, ''सरपंच पदाच्या कालावधीत पती संजय पोहकर हे ग्रामपंचायतीची पायरी देखील चढले नाहीत. कधीही कामात हस्तक्षेप केला नाही. महिलांनी आत्माविश्वासाने व अभ्यासपूर्वक काम केल्यास कोणीही कामकाजात लुडबुड करत नाहीत, असा माझा अनुभव आहे, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजून दाद दिली. 

मंचर पोलिस ठाण्याचा कारभार महिला दिनानिमित्त महिला पोलीसांकडे सोपविण्यात आला होता. आलेल्या प्रत्येक नागरिकाबरोबर सवांद साधून प्रश्न मार्गी लावले जात होते. आलेल्या महिलाना गुलाबाची फुले पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, पोलीस अर्चना गवारी, मोनिका राक्षे, रेश्मा गाडगे, पूजा गारगोटे, शर्मिला होले, सुरेखा बरकड यांच्या हस्ते दिली जात होती.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com