पंचनाम्याची प्रत देण्यास मंचर पोलिसांची टाळाटाळ

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 18 मे 2018

मंचर: येथील अपंग असलेले संगणकतज्ज्ञ नरेंद्र सोपानराव होले (वय 52) यांचा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेस इमारतीजवळ आठ महिन्यांपूर्वी अपघात झाला. मात्र, या अपघाताच्या पंचनाम्याची प्रत मिळण्यासाठी त्यांनी अनेकदा पोलिसांशी संपर्क केला; पण अजूनही मंचर पोलिसाकडून पंचनाम्याची प्रत मिळाली नाही. "अपघात करणाऱ्या आरोपीला पोलिस पाठीशी घालत आहेत,' असा आरोप होले यांनी केला आहे.

अपघातानंतर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचा खुबा बदलण्यासाठी व आतापर्यंत त्यांना वैद्यकीय उपचारासाठी चार लाख रुपये खर्च झाला आहे. विमा कंपनीकडे ते दाद मागणार आहेत. ता. 6 सप्टेंबर 2017 रोजी मित्राच्या दुचाकीवर मागे बसून होले घरी जात होते. त्या वेळी मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये उजव्या पायाचा खुबा मोडला. होले यांना पुण्याच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शस्त्रक्रिया करून कृत्रिम खुबा बसविल्यानंतर होले मंचरला आले. ता. 16 सप्टेंबर रोजी मंचर पोलिस ठाण्यात पोलिसांनी अपघाताबाबत गुन्हा नोंदविला.

अपघातग्रस्त ट्रक मालक चौधरी (रा. राजगुरुनगर) यांचा मोबाईल क्रमांक पोलिस हवालदार शिंदे यांना दिला. शिंदे यांनी चौधरी यांच्याबरोबर चर्चाही केली. त्या वेळी माझ्यासमवेत डॉ. प्रताप वळसे पाटील होते. मी अनेकदा संपर्क केल्यानंतर शिंदे यांनी तलाठी, रहिवासी, ग्रामपंचायत, उत्पन्नाचा दाखला, जन्मतारीखचा व शिक्षणाचा पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, लाइट बिल, 2017-18 चे उत्पन्नाबाबत सी.ए.चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे द्या. त्यानंतर अपघाताचा पंचनामा शोधून देईन, असे उत्तर दिले आहे. पंचनामा मिळण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे लागतात. हे ऐकून मलाही धक्का बसला. मोटार अपघात विम्यासाठी दावा दाखल करायचा आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज आहे.
- नरेंद्र होले, अपघातग्रस्त

Web Title: manchar Police stalks to give copies of panchanama