भीमाशंकर परिसराचा १३९ कोटींचा आराखडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मंचर/राजगुरूनगर - राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या १३९ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. 

मंचर/राजगुरूनगर - राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या १३९ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश गोरे आणि संबंधित अधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात भीमाशंकर परिसर विकास आराखड्याबाबत बैठक झाली. या वेळी प्रकल्प आराखड्यास मान्यता देऊन हा आराखडा उच्च अधिकार समितीकडे पाठविण्याबाबतचा आदेश मुनगंटीवार यांनी दिला. वळसे पाटील हे भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या कामाचा पाठपुरावा सातत्याने करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी मुनगंटीवार यांनी भीमाशंकरला भेट देऊन नियोजित कामांची पाहणी करून विकास आराखडा तयार करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला होता.

‘‘भीमाशंकर मंदिराच्या सभागृहाचे काम नव्याने करणे, प्रशस्त प्रवेशद्वार उभारणे, पायरी मार्ग सुधारणा करणे, भक्तांसाठी मंदिर परिसरात बांधकाम करणे, भीमानदी उगमस्थान व कुंडाचे सुशोभीकरण करणे, पोलिस ठाणे इमारत व पोलिस कर्मचारी निवास बांधकाम, बस स्थानक व परिसर सुधारणा करणे, भीमाशंकर परिसरात पाच वाहनातळ उभारणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी व नळ पाणीपुरवठा सुरू करणे आदी कामांचा या आराखड्यात समावेश असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, या आराखड्यात भोरगिरी परिसराचा समावेश करण्याची मागणी आमदार सुरेश गोरे यांनी केली.

Web Title: manchar pune news 139 crore rupees plan for Bhimashankar area