
Shiv Jayanti 2023 : मंचरला शिवजयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा; एक हजाराहून अधिक मुला मुलींचा सहभाग
मंचर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराय उत्सव समिती व धनेशभाऊ बाणखेले युवा मंच मंचर शहर यांच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.
मंचर (ता.आंबेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, माजी सरपंच मीरा बाणखेले,
अश्विनी शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर स्पर्धेचा शुभारंभ झाला. निघोटवाडी फाटा लहान गट (तीन किलोमीटर), भीमाशंकर हॉस्पिटल मध्यम गट (चार किलोमीटर) व वडगाव काशिंबेग खुला गट (पाच किलोमीटर) यामध्ये मुले व मुली यांचा सहभाग होता. स्पर्धेतील विजेत्यांना संजय थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
अनुक्रमे एक ते चार क्रमांकाचे विजेत
लहान गट -
मुले : सिद्धिराज शिंदे, साईराज भोर, आर्यन निघोट, साईराज शिंदे, मुली : स्वरा बेंडे, आर्या डोके, दिव्या केदारी, कृष्णा आचार्य,
मध्यम गट –
मुले : स्वराज हिंगे, मोहित यादव, दर्शन काळभोर, शुभम भोर
मुली : पायल केदारी, जानवी सोमवंशी, आर्या वायाळ, वैष्णवी हाडवळे ,
खुला गट –
मुले : सचिन भारद्वाज, संजय गौडगुंडा, प्रणव वाबळे, लघु खरात, मुली : ऋतुजा मालवदकर, निकिता थोरात, पूनम आमले, शिल्पा लबडे
स्पर्धेचे आयोजन व व्यवस्था भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष धनेश बाणखेले यांनी केले. अवधुत बाणखेले, मनोज लोखंडे, दत्ता पिंगळे, सागर पिंगळे, सुशांत रोकडे, माऊली लोखंडे, शुभम गवळी, हेमंत चासकर,साहिल सय्यद यांनी पहिली. अलंकार बाणखेले यांनी सूत्रसंचालन केले